Stocks to Buy : पुढच्या तीन-चार आठवड्यात मजबूत नफा देऊ शकतात हे ८ शेअर; तज्ज्ञांना विश्वास
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Stocks to Buy : पुढच्या तीन-चार आठवड्यात मजबूत नफा देऊ शकतात हे ८ शेअर; तज्ज्ञांना विश्वास

Stocks to Buy : पुढच्या तीन-चार आठवड्यात मजबूत नफा देऊ शकतात हे ८ शेअर; तज्ज्ञांना विश्वास

Updated Jul 15, 2024 10:56 AM IST

stocks to buy : शेअर बाजारातील रोजच्या घडामोडींवर नजर ठेवणाऱ्या ब्रोकरेज फर्म्स व तज्ज्ञांनी पुढील काही दिवसांत नफा मिळवून देणाऱ्या आठ शेअर्सची यादी दिली आहे.

Stocks to Buy : पुढच्या तीन-चार आठवड्यात मजबूत नफा देऊ शकतात हे ८ शेअर; तज्ज्ञांना विश्वास
Stocks to Buy : पुढच्या तीन-चार आठवड्यात मजबूत नफा देऊ शकतात हे ८ शेअर; तज्ज्ञांना विश्वास (Pixabay)

शेअर बाजारात मागील काही दिवसांचा तेजीचा कल आजही कायम दिसत आहे.  सेन्सेक्स व निफ्टी रोजच्या रोज नवनवे उच्चांक गाठत आहेत. जून तिमाहीचे चांगले निकाल आणि विकासाभिमुख अर्थसंकल्पाच्या अपेक्षेमुळं बाजाराला आणखी मजबुती मिळत आहे. 

गुंतवणूकदार आणि व्यापाऱ्यांनी भान राखून मूलभूत आणि तांत्रिकदृष्ट्या मजबूत शेअर्सवर सट्टा लावावा, असा सल्ला तज्ज्ञ देतात. अनेक तज्ज्ञांच्या शिफारशींनुसार पुढील ३-४ आठवड्यांत खालील ८ शेअर ७ ते २० टक्क्यांनी वाढू शकतात. कोणते आहेत हे शेअर्स? पाहूया

अ‍ॅक्सिस सिक्युरिटीजची शिफारस

दालमिया भारत

दालमिया भारत हा शेअर आज १९३०.५८ रुपयांवर ट्रेड करत आहे. हा शेअर २११३ ते २१५० पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. १९२५ ते १८८७ च्या दरम्यान घेतल्यास तो चांगला फायदा देऊ शकतो. स्टॉप लॉस १८०३ रुपयांवर लावावा.

ब्रिटानिया इंडस्ट्रीज

हा शेअर सध्या ५८३८ रुपयांवर ट्रेड करत आहे. यात पुढील काही दिवसांत ९ टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे. तो ६२८५ पर्यंत जाऊ शकतो. ५,७५० ते ५,६३६ रुपयांच्या रेंजमध्ये घेण्याची संधी आहे. स्टॉपलॉस ५,४६० रुपये ठेवावा.

बिर्लासॉफ्ट

बिर्लासॉफ्टचा शेअर सध्या ७४० च्या आसपास ट्रेड करत आहे. हा शेअर ८२० रुपयांपर्यंत वधारण्याची शक्यता आहे. ७२५ रुपयांपर्यंत खरेदी करून होल्ड करता येईल. ६७८ वर स्टॉपलॉस लावता येईल.

मणप्पुरम फायनान्स

हा शेअर सध्या २२५ रुपयांच्या आसपास ट्रेड करत आहे. यात तब्बल १६ टक्के वाढीचा अंदाज असून हा शेअर २६० रुपयांपर्यंत जाऊ शकतो. २२२ रुपयांपर्यंत खरेदी करून २०४ रुपयांवर स्टॉप लॉस लावल्यास फायदा होऊ शकतो.

आनंद राठी शेअर अँड स्टॉक ब्रोकर्सचे जिगर पटेल यांची शिफारस

मंगलोर रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स (एमआरपीएल)

हा शेअर सध्या २४१ च्या आसपास व्यवहार करत आहे. हा शेअर १२ टक्क्यांनी वाढून २७० पर्यंत मजल मारेल असा अंदाज आहे. २४५ रुपयांपर्यंत घेण्याची संधी आहे.

बिर्लासॉफ्ट 

अ‍ॅक्सिस सिक्युरिटीज प्रमाणेच आनंद राठीचे जिगर पटेल हे देखील या शेअरवर बुलीश आहेत. हा शेअर ७८० रुपयांपर्यंत जाईल, असा पटेल यांचा अंदाज आहे. 

हिकल

हिकल कंपनीचा शेअर सध्या ३६१ च्या आसपास ट्रेड करत आहे. या शेअरमध्ये १८ टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे. तो ४२५ रुपयांवर जाईल असा अंदाज आहे.

‘प्रभुदास लिलाधर’चे शिजू कुथुपलक्कल यांची शिफारस

दालमिया भारत

अ‍ॅक्सिस सिक्युरिटीजनंतर प्रभुदास लिलाधर ब्रोकरेजनंही या शेअरबद्दल आशावाद दर्शवला आहे. १९३५ रुपयांच्याा आसपास असलेला हा शेअर २२०० वर जाऊ शकतो असा ब्रोकरेजचा अंदाज आहे. 

आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स

आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स हा शेअर सध्या ६८ रुपयांच्या अवतीभोवती फिरत आहे. हा शेअर ८२ रुपयांपर्यंत जाईल असा अंदाज आहे. ६४ रुपयांचा स्टॉपलॉस ठेवून यात गुंतवणूक करता येईल.

व्होल्टास

व्होल्टास हा शेअर १७३० रुपयांवर जाईल असा अंदाज आहे. सध्या हा शेअर १५२८ रुपयांच्या आसपास आहे. या पातळीवरून शेअरमध्ये १४ टक्के वाढीची अपेक्षा आहे.

 

(डिस्क्लेमर : या लेखातील तज्ञांच्या शिफारशी, सूचना आणि मते ही त्यांची स्वतःची आहेत. हिंदुस्तान टाइम्स मराठीची नाहीत. ही केवळ शेअर्सच्या कामगिरीची माहिती आहे, गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते. गुंतवणूक करण्याआधी तुमच्या आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)

Whats_app_banner