Stocks to buy : पुढच्या महिनाभरात १५ टक्क्यांपर्यंत वाढू शकतात हे १० शेअर, तुमच्याकडं आहेत का?-stocks to buy these 10 stocks can rise 6 16 in next 3 4 weeks do you own any ,बिझनेस बातम्या
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Stocks to buy : पुढच्या महिनाभरात १५ टक्क्यांपर्यंत वाढू शकतात हे १० शेअर, तुमच्याकडं आहेत का?

Stocks to buy : पुढच्या महिनाभरात १५ टक्क्यांपर्यंत वाढू शकतात हे १० शेअर, तुमच्याकडं आहेत का?

May 13, 2024 02:04 PM IST

Stocks to buy : टायटन, हिरो मोटोकॉर्प, झोमॅटो, गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स यांसारख्या शेअरच्या भावात पुढील काही दिवसांत ६ ते १६ टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.

पुढच्या महिनाभरात १५ टक्क्यांपर्यंत वाढू शकतात हे १० शेअर, तुमच्याकडं आहेत का?
पुढच्या महिनाभरात १५ टक्क्यांपर्यंत वाढू शकतात हे १० शेअर, तुमच्याकडं आहेत का? (Pixabay)

Stocks to Buy : भारतीय शेअर बाजाराचा निर्देशांक (Nifty Fifty) आज, १३ मे रोजी इंट्राडे ट्रेडिंगमध्ये एक टक्क्यापेक्षा जास्त घसरला. गेल्या काही दिवसांपासून देशांतर्गत बाजारात मोठी अस्थिरता दिसत आहे. लोकसभा निवडणूक २०२४ च्या निकालाआधी परकीय भांडवलाचा ओघ वाढल्यानं ही अस्थिरता कायम राहण्याची शक्यता बाजार तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

बाजारात अस्थिरता दिसत असली तरी अल्प मुदतीसाठी तांत्रिकदृष्ट्या मजबूत आधार असलेले समभाग निवडण्याचा सल्ला बाजार तज्ज्ञ देतात. अनेक तज्ज्ञांच्या शिफारशींच्या आधारे पुढील ३-४ आठवड्यांत ६ ते १६ टक्क्यांनी वाढू शकणारे १० शेअर्स इथं देत आहोत.

अ‍ॅक्सिस सिक्युरिटीजच्या अभ्यासानुसार…

हीरो मोटोकॉर्प (Hero Motocorp)

हीरो मोटोकॉर्पच्या शेअरचा सध्याचा भाव ४७७९ रुपये आहे. हा शेअर ४,८०० ते ४७०४ च्या रेंजमध्ये खरेदी करता येईल. हा शेअर १३ टक्क्यांनी वधारू शकतो. तो ५२५६ ते ५५०० पर्यंत वर जाऊ शकतो. ४,५०० रुपयांवर स्टॉप लॉस लावता येईल.

गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स (Godrej Consumer Products)

या शेअरचा सध्याचा भाव १३४६ च्या आसपास आहे. १,३०० ते १२७४ च्या दरम्यान खरेदीसाठी संधी आहे. हा शेअर ६ टक्क्यांनी वधारून १३८१ ते १४०० रुपयांपर्यंत जाऊ शकतो. १२४० रुपयांचा स्टॉप लॉस लावून हा शेअर खरेदी करता येईल.

झोमॅटो (Zomato)

झोमॅटोच्या शेअरचा सध्याचा भाव १९७.५० रुपयांवर आहे. हा शेअर १९६ ते २०० च्या रेंजमध्ये खरेदी करता येऊ शकतो. आताच्या किंमतीपासून हा शेअर १६ टक्क्यांनी म्हणजेच २२९ ते २३४ पर्यंत झेप घेऊ शकतो. १८८ रुपयांवर स्टॉप लॉस लावून हा शेअर खरेदी करता येईल.

किर्लोस्कर इलेक्ट्रिक कंपनी (Kirloskar Electric Company Ltd)

किर्लोस्कर इलेक्ट्रिक कंपनीचा शेअर सध्या १८४.२० रुपयांवर ट्रेड करत आहे. १६१ ते १६५ दरम्यान हा शेअर खरेदी करता येईल. हा शेअर येत्या काही दिवसांत १९४ रुपयांपर्यंत जाऊ शकतो. १५१ रुपयांचा स्टॉप लॉस लावून तो खरेदी करता येईल.

आनंद राठी शेअर अँड स्टॉक ब्रोकर्सचे सीनियर मॅनेजर जिगर एस. पटेल यांच्या माहितीनुसार…

टायटन (Titan)

१ एप्रिल २०२४ रोजी ३,८०० रुपयांच्या पातळीवरून या शेअरमध्ये जवळपास ६०० अंकांची म्हणजेच १६ टक्क्यांची लक्षणीय घसरण दिसून आली. मात्र, आता एक जबरदस्त संधी समोर आली आहे. टायटनच्या शेअरचा भाव सध्या ३२६१.८० रुपये इतका आहे. ३२५० रुपयांपर्यंत हा शेअर खरेदी करण्यास संधी आहे. हा शेअर पुढच्या २० ते २५ दिवसांत ३५०० वर जाण्याची शक्यता आहे. ३१६५ चा स्टॉप लॉस लावून हा शेअर खरेदी करता येईल.

हिंदुस्तान एरोनॉटिक्स (HAL)

हिंदुस्तान एरोनॉटिक्सच्या शेअरची सध्याची किंमत ३८९४ इतकी आहे. हा शेअर ३८२५ ते ३८७५ च्या दरम्यान खरेदी करता येईल. या शेअरमध्ये ६ टक्के तेजीचा अंदाज असून तो ४१०० रुपयांवर जाऊ शकतो. ३६८८ रुपयांचा स्टॉप लॉस लावून हा शेअर खरेदी करता येईल.

एजिस लॉजिस्टिक्स (Aegis Logistics Ltd)

एजिस लॉजिस्टिक्सचा भाव सध्या ५९६ रुपयांच्या आसपास आहे. हा शेअर ५९५ ते ६०० रुपयांच्या दरम्यान खरेदी करता येईल. या शेअरमध्ये तब्बल १३ टक्क्यांच्या तेजीची शक्यता असून तो ६७५ रुपयांपर्यंत जाईल असा अंदाज आहे. ६४० रुपयांचा स्टॉप लॉस लावून तो खरेदी करता येईल.

प्रभुदास लिलाधर प्रायव्हेट लिमिटेडचे टेक्निकल रिसर्च अ‍ॅनालिस्ट शिजू कुथुपलक्कल यांच्या अंदाजानुसार…

झेनसार टेक्नॉलॉजीज (ZensarTech)

झेनसार टेक्नॉलॉजीसच्या शेअरचा सध्याचा भाव ६१० रुपयांवर आहे. हा शेअर ६६८ रुपयांपर्यंत वर जाण्याचा अंदाज आहे. ५७२ रुपयांचा स्टॉप लॉस लावून खरेदीची संधी घेता येईल, असं तज्ज्ञांचं मत आहे.

पिडिलाईट इंडस्ट्रीज (Pidilite Industries)

ब्लू चिप स्टॉक अशी ओळख असलेल्या पिडिलाइटचा शेअर सध्या २९७६ रुपयांच्या आसपास ट्रेड करत आहे. हा शेअर ३२२० रुपयांपर्यंत जाईल असा अंदाज आहे. २८०० चा स्टॉप लॉस लावून हा खरेदी करता येऊ शकतो.

जेएसडब्ल्यू एनर्जी (JSW Energy)

जेएसडब्लू एनर्जीचा शेअर सध्या ५७० रुपयांच्या किंमतीवर आहे. हा शेअर येत्या काही दिवसांत ६४० पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. या सुमारे १२ टक्क्यांपर्यंत तेजीचा अंदाज आहे.

 

(डिस्क्लेमर: वरील मते आणि शिफारसी वैयक्तिक विश्लेषक, तज्ञ आणि ब्रोकरेज फर्मच्या आहेत. हा कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते. गुंतवणुकीचा निर्णय घेण्याआधी संबंधितांनी आपल्या वैयक्तिक सल्लागारांशी चर्चा करावी.)

विभाग