मराठी बातम्या  /  बिझनेस  /  stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

May 17, 2024 09:58 AM IST

Stocks to buy or sell : लोकसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर चढउताराच्या हिंदोळ्यावर असलेल्या शेअर बाजाराचा मूड आज कसा राहील? कोणत्या स्टॉकमध्ये संधी आहे, सांगतायत सुमीत बगाडिया…

stocks to buy or sell : आठवड्याच्या शेवटच्या दिवशी आज 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर
stocks to buy or sell : आठवड्याच्या शेवटच्या दिवशी आज 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

Stocks to buy or sell : शेअर बाजारात आज या आठवड्यातील ट्रेडिंगचा शेवटचा दिवस आहे. बुधवारी विश्रांती नंतर गुरुवारी पुन्हा एकदा भारतीय बाजारात तेजी दिसली. निफ्टी ५० निर्देशांक २०३ अंकांनी तर बीएसई सेन्सेक्स ६७६ अंकांनी वधारला. बँक निफ्टी निर्देशांकही २८९ अंकांनी वधारून बंद झाला. त्यामुळं आज काय होणार याकडं गुंतवणूकदारांचं लक्ष आहे. अशातच चॉइस ब्रोकिंगचे अनुभवी कार्यकारी संचालक सुमीत बगडिया यांनी महत्त्वाच्या शिफारशी केल्या आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

शेअर बाजारातील या तेजीमध्ये काही शेअर्सनी चार्ट पॅटर्नवर निर्णायक ब्रेकआऊट दिला. हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल), ओबेरॉय रियल्टी, टिटागड वॅगन, ब्लू स्टार आणि एनसीसी या पाच शेअर्सबाबत बागडिया आशावादी आहेत.

भारतीय शेअर बाजाराच्या आजच्या वाटचालीबाबत सुमीत बगडिया म्हणाले, 'इंडिया व्हीआयएक्स आज १९ ते २२ च्या रेंजमध्ये आहे. इंडिया व्हीआयएक्स निर्देशांक १९ च्या खाली गेला तर आपण भारतीय शेअर बाजारात आणखी काही स्थैर्य आणि काही नवीन खरेदीची अपेक्षा करू शकतो. मात्र, निर्देशांक २२ च्या वर गेल्यास भारतीय शेअर बाजारात अधिक अस्थिरता निर्माण होऊ शकते.

निफ्टीला आज २२,२०० ते २२,२५० च्या पातळीवर सपोर्ट दिसत आहे, मात्र २२,५५० ते २२,६०० च्या रेंजवर प्रतिकाराला सामोरं जावं लागणार आहे. एकूणच बाजाराचा कल सकारात्मक गृहित धरून गुंतवणूकदार आणि व्यापाऱ्यांनी ‘बाय ऑन डिप्स’चं धोरण अवलंबावं,' असा सल्ला सुमीत बगाडिया यांनी दिला आहे.

आज हे शेअर खरेदी करता येतील!

एचएएल : ४४४४ रुपयांचा स्टॉप लॉस लावून हा शेअर ४६०३.७० रुपयांवर खरेदी करा. हा शेअर ४८५० वर जाऊ शकतो.

ओबेरॉय रियल्टी : १७११ रुपयांवर खरेदी करा. हा शेअर १८१८ रुपयांवर जाऊ शकतो.

टीटागढ़ : ११७५ रुपयांच्या स्टॉप लॉससह हा शेअर १२१२.५० रुपयांवर खरेदी करा. तो १२७७ रुपयांवर जाऊ शकतो.

ब्लू स्टार: हा शेअर १६५० रुपयांवर जाऊ शकतो. १५६९.७५ रुपयांवर खरेदी करता येईल.

एनसीसी : हा शेअर २७३.५५ रुपयांवर खरेदी करता येईल. २८८ पर्यंत हा शेअर मजल मारू शकतो.

(डिस्क्लेमर: वर केलेली मते आणि शिफारशी वैयक्तिक विश्लेषक किंवा ब्रोकिंग कंपन्यांची आहेत, मिंटची नाहीत. आम्ही गुंतवणूकदारांना कोणताही गुंतवणुकीचा निर्णय घेण्यापूर्वी प्रमाणित तज्ञांचा सल्ला घेण्याचा सल्ला देतो.)

WhatsApp channel
विभाग