Share Market News : शेअर बाजारात चढउतार सुरू असताना आठवड्याच्या पहिल्या दिवशीच्या ट्रेडिंगसाठी तज्ञांनी आज एकूण १० शेअर्स सुचवले आहेत. चॉइस ब्रोकिंगचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर सुमित बागरिया यांनी पाच ब्रेकआउट स्टॉक्ससह एकूण सात, आनंद राठी येथील टेक्निकल रिसर्चचे वरिष्ठ व्यवस्थापक गणेश डोंगरे यांनी तीन शेअर्स सुचवले आहेत.
तज्ञांनी सुचवलेल्या स्टॉक्समध्ये आरती फार्मालॅब्स लिमिटेड, एनडीआर ऑटो कंपोनेंट्स लिमिटेड, आयटीसी लिमिटेड, टोरंट पॉवर लिमिटेड, व्होल्टास लिमिटेड, भारती हेक्साकॉम, वेलस्पन कॉर्प, केआरबीएल, शारदा एनर्जी अँड मिनरल्स आणि कॅन्टाबिल रिटेल इंडिया लिमिटेड या स्टॉक्सचा समावेश आहे.
सुमित बागरिया यांचे शेअर्स
आरती फार्मालॅब्स :
आरती फार्मालॅब्सवर ७४०.८५ रुपयांना खरेदीची शिफारस केली असून टार्गेट ७९० रुपये आहे.
एनडीआर ऑटो कंपोनेंट्स ७८८.२५ रुपयांना खरेदी करण्याची शिफारस केली आहे. त्याची टार्गेट प्राइस ८४० असून स्टॉपलॉस ७६० रुपये आहे.
गणेश डोंगरे यांची शिफारस
आयटीसीवर ४३० रुपयांना खरेदी करा. टार्गेट ४६० रुपये आणि स्टॉपलॉस ४१५ रुपये आहे.
टोरंट पॉवर हा शेअर १४५० रुपयांच्या टार्गेट प्राइससाठी स्टॉपलॉस १३७० रुपये ठेवून १४०५ रुपयांना खरेदी करा.
व्होल्टासवर १३८० रुपयांना खरेदी ची शिफारस केली आहे. टार्गेट १४३० रुपये असून स्टॉपलॉस १३६० रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे.
बागरिया यांनी सुचवलेले ब्रेकआऊट स्टॉक
भारती हेक्साकॉम १४६५.८ रुपयांना खरेदी करा. लक्ष्य १५७० रुपये ठेवा आणि स्टॉपलॉस १४१५ रुपयांवर ठेवा.
हा शेअर ८०१.७५ रुपयांना खरेदी करा. टार्गेट ८५० रुपये आणि स्टॉपलॉस ७७० रुपये ठेवा.
केआरबीएल शेअर ३०१.३ रुपयांना खरेदी करा. टार्गेट ३२० रुपये ठेवा आणि स्टॉपलॉस २९० रुपये ठेवा.
शारदा एनर्जी अँड मिनरल्सचा शेअर ४६६.२५ रुपयांना खरेदी करा.
कँटाबिल रिटेल इंडिया हा शेअर ३२९.८५ रुपयांना खरेदी करा. टार्गेट ३५० रुपये आणि स्टॉपलॉस ३२० रुपये ठेवा.
संबंधित बातम्या