Stocks Market News Updates : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा लागलेला निकाल, अदानी समूहावर झालेले आरोप आणि बाजारात पुन्हा येत असलेल्या तेजीच्या पार्श्वभूमीवर नेमके कोणते शेअर खरेदी करावेत याची शिफारस शेअर मार्केट अभ्यासकांनी केली आहे.
चॉइस ब्रोकिंगचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर सुमित बगरिया यांनी एकूण ७ स्टॉक्सची निवड करण्याची शिफारस केली आहे. आनंद राठी येथील टेक्निकल रिसर्चचे वरिष्ठ व्यवस्थापक गणेश डोंगरे यांनी तीन स्टॉक आयडिया सुचविल्या आहेत. दोघांनी सुचवलेल्या कंपन्यांमध्ये एचसीएल टेक्नॉलॉजीज लिमिटेड, अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड, अरबिंदो फार्मा लिमिटेड, झायडस लाइफसायन्सेस लिमिटेड, गणेश हाऊसिंग कॉर्पोरेशन, जगसोनपाल फार्मा, पुडुमजी पेपर प्रॉडक्ट्स, बनारस बीड्स, पेटीएम आणि कोल इंडिया लिमिटेड यांचा समावेश आहे.
कोणते शेअर कोणत्या पातळीवर घ्यावेत व टार्गेट प्राइस काय असावी जाणून घेऊया…
एचसीएल टेक्नॉलॉजीज लिमिटेड : एचसीएल टेक्नॉलॉजीज १८९८ रुपयांना घ्यावा. स्टॉपलॉस १८३० रुपये आणि टार्गेट २०१५ रुपये ठेवावे.
अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड : ११,९५० रुपयांचं टार्गेट ठेवून हा शेअर १०९७५ रुपयांच्या स्टॉपलॉससह ११३७५ रुपयांना खरेदी करावा.
गणेश हाऊसिंग कॉर्पोरेशन : हा शेअर ११९६.०५ रुपयांना खरेदी करावा. टार्गेट प्राइस १२७० रुपये आणि स्टॉपलॉस ११५० रुपये ठेवावा.
जगसनपाल फार्मा : हा शेअर ६३७.७० रुपयांना खरेदी करावा. टार्गेट प्राइस ६८५ रुपये आणि स्टॉपलॉस ६१६ रुपये ठेवावा.
पुडुमजी पेपर प्रॉडक्ट्स : खरेदी १४२.०३ रुपयांवर करावी. टार्गेट प्राइस १५० रुपये ठेवावी आणि स्टॉपलॉस १३६ रुपये ठेवावा.
बनारस बीड्स : हा शेअर खरेदी १४६.५४ रुपयांवर खरेदी करावा. टार्गेट १५५ रुपये ठेवून स्टॉपलॉस १४१ रुपये ठेवावा.
पेटीएम : हा शेअर ९००.९५ रुपयांत खरेदी करावा. ९७५ रुपयांचं टार्गेट ठेवून स्टॉपलॉस ८६५ रुपयांवर ठेवावा.
अरविंदो फार्मा लिमिटेड : अरबिंदो फार्मा १२२५ रुपये दरानं खरेदी करणं चांगलं असून १२०४ रुपयांच्या स्टॉप लॉससह टार्गेट प्राइस १,२५० रुपये ठेवावं.
झायडस लाइफसायन्सेस लिमिटेड : झायडस लाइफसायन्सेस ९५० रुपयांना विकत घेता येईल. ९७५ रुपयांच्या टार्गेटसाठी ९३५ रुपये स्टॉपलॉस ठेवावा.
कोल इंडिया लिमिटेड : कोल इंडियाचा शेअर ४२५ रुपयांच्या टार्गेटसाठी ४०७ रुपये स्टॉपलॉससह ४१५ रुपयांना खरेदी करावा.