RBI Monetary Policy : केंद्रीय अर्थसंकल्पानंतर आता रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणाची प्रतीक्षा अर्थजगताला आहे. हे पतधोरण शुक्रवार, ७ फेब्रुवारी रोजी जाहीर होणार आहे. आरबीआयकडून रेपो दरात कपात होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर तज्ञांनी खरेदीसाठी ५ शेअर्स सुचवले आहेत.
चॉइस ब्रोकिंगचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर सुमित बागरिया यांनी आजसाठी दोन स्टॉक निवडीची शिफारस केली आहे. आनंद राठी येथील टेक्निकल रिसर्चचे वरिष्ठ व्यवस्थापक गणेश डोंगरे यांनी ३ शेअर्स सुचवले आहेत.
यात अपोलो हॉस्पिटल्स एन्टरप्राइज लिमिटेड, एक्लेर्क्स सर्व्हिसेस लिमिटेड, द रॅम्को सिमेंट्स लिमिटेड, अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड आणि आयटीसी लिमिटेड यांचा समावेश आहे.
सुमित बागरिया यांचे शेअर्स
अपोलो हॉस्पिटल्स हा शेअर ६९४४ रुपयांना विकत घ्यावा. टार्गेट प्राइस ७४३० रुपये आणि स्टॉपलॉस ६७०० रुपये ठेवा.
ईक्लेर्क्स सर्व्हिसेस हा शेअर ३३१५ रुपयांची टार्गेट प्राइस ठेवून ३२८६.९० रुपयांपर्यंत खरेदी करा. ३१७२ रुपये स्टॉपलॉस ठेवा.
गणेश डोंगरे यांचे शेअर्स
रामको सिमेंट्सच्या शेअरवर ९२५ रुपयांचं टार्गेट ठेवून हा शेअर ९०० रुपयांना खरेदी करा. स्टॉपलॉस ८८४ रुपये ठेवा.
अदानी पोर्ट्स ११४५ रुपयांना खरेदी करा. टार्गेट प्राइस १,१७७ रुपये आणि स्टॉपलॉस १,१२० रुपये ठेवा.
आयटीसी लिमिटेडवर ४४८ रुपये बाय रेटिंग आहे. स्टॉपलॉस ४४० रुपये असून टार्गेट प्राइस ४७५ रुपये आहे.
संबंधित बातम्या