Share market updates : इंट्रा डे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी तज्ज्ञांनी आज खास सल्ला दिला आहे. आजच्या ट्रेडिंगसाठी तज्ज्ञांनी १०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचे ५ शेअर्स सुचवले आहेत.
एसएस वेल्थस्ट्रीटच्या सुगंधा सचदेवा आणि हेन्सेक्स सिक्युरिटीजचे एव्हीपी (रिसर्च) महेश एम ओझ यांनी या शेअर्सची नावं सांगितली आहेत. त्यात मनाली पेट्रो, आयओबी, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनी (एचसीसी) आणि पटेल इंजिनीअरिंग यांचा समावेश आहे.
सुगंधा सचदेवा यांनी मनाली पेट्रो हा शेअर ६५ रुपयांना खरेदी करण्याची शिफारस केली आहे. टार्गेट प्राइस ७०.३० रुपये असून स्टॉपलॉस ६१.७० रुपये ठेवण्यास सांगितलं आहे. या शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांक १०४.९५ रुपये आणि नीचांकी स्तर ५७.१० रुपये आहे.
आयओबीचा शेअर ५३ रुपयांना खरेदी करा. टार्गेट प्राइस ५७.५० रुपये आणि स्टॉपलॉस ५०.७० रुपये ठेवा. शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ८३.७५ रुपये आणि नीचांकी स्तर ४०.०५ रुपये आहे.
हा शेअर ५९ रुपये, ६२ रुपये आणि ६५ रुपये या टार्गेटसह ५६ ते ५६.७५ रुपयांना खरेदी करा. स्टॉप लॉस ५३.७० रुपयांवर ठेवा. शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ७६.९० रुपये आणि नीचांकी स्तर ४५ रुपये आहे.
एचसीसी हा शेअर ४५ ते ४६ रुपयांना खरेदी करून टार्गेट ४८, ५१ आणि ५४ रुपयांपर्यंत ठेवा. तर, स्टॉपलॉस ४३.५० रुपये ठेवा. शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ५७.५० रुपये आणि नीचांकी स्तर २६.९० रुपये आहे.
हा शेअर ५४ ते ५५ रुपयांना खरेदी करा आणि ५७.५० रुपये, ५९ रुपये आणि ६१ रुपये टार्गेट ठेवा. स्टॉपलॉस ५१.८० रुपये ठेवायला विसरू नका.
संबंधित बातम्या