शेअर बाजारात यशस्वी ट्रेडिंग करायची तर बाजाराची आणि कंपन्यांतील घडामोडींची खडान् खडा माहिती ठेवणं गरजेचं असतं. नामांकित बाजार तज्ज्ञ, विश्लेषकही अधूनमधून बाजारात चलती असलेल्या स्टॉक्सची माहिती देत असतात. आजचा दिवसही त्यास अपवाद नाही.
आज इंडिगो एअरलाइन्सची भागीदार कंपनी इंटरग्लोब एव्हिएशन, आयटीसी, आयसीआयसीआय लोम्बार्ड, यथार्थ हॉस्पिटल आणि ट्रॉमा केअर सर्व्हिसेस, मेट्रो ब्रँडसारखे शेअर चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. आज या समभागांच्या खरेदी-विक्रीवर गुंतवणूकदारांच्या नजरा लागलेल्या असतील. आज या शेअर्सच्या व्यवहारांवर लक्ष का असेल याची कारणं जाणून घेऊया…
इंडिगो एअरलाइन्सच्या या भागीदार कंपनीनं चौथ्या तिमाहीत तब्बल १८९४.८ कोटी रुपयांचा नफा मिळवला आहे. कंपनीचा महसूल २६ टक्क्यांनी वाढून ७८२५.३ कोटी रुपये झाला आहे. एखाद्या भारतीय विमान कंपनीला एक अब्ज डॉलर्सचा नफा होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
हेल्थकेअर क्षेत्रातील या कंपनीच्या निव्वळ विक्रीत २३.६२ टक्के वाढ होऊन ती १७.७ कोटी रुपयांवर गेली आहे आणि निव्वळ नफ्यात १२१.४३ टक्के वाढ होऊन ती ३८.३५ कोटी रुपये झाली आहे.
शेवटच्या तिमाहीत या कंपनीच्या निव्वळ विक्रीत ७.१४ टक्क्यांची वाढ होऊन ती ५८२.९ कोटी रुपये झाली आहे. तर, निव्वळ नफ्यात १२६.५६ टक्के वाढ होऊन तो १५५.१७ कोटी रुपये झाला आहे.
ग्राहकोपयोगी क्षेत्रातील या बड्या कंपनीनं चौथ्या तिमाहीत ५०२०.२ कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळवला आहे. मागील वर्षाशी तुलना करता त्यात १.३१ टक्क्यांची घसरण आहे. कंपनीचा महसूल १.४० टक्क्यांनी वाढून १७७५२.८७ कोटी झाला आहे.
जीएसटी अधिकाऱ्याकडून नोटीस मिळाल्याचं कंपनीनं उघड केलं आहे. दिल्ली सरकारनं एप्रिल २०१९ ते मार्च २०२० या कालावधीसाठी कथित GST दायित्वाबाबत स्पष्टीकरण मागितलं आहे. नोटीसमध्ये १४९.५५ कोटी रुपयांची मागणी, १२४.३५ कोटी रुपये व्याज आणि १४.९६ कोटी रुपयांचा दंड आहे.
पहिल्या सहामाहीत ३८.६७ कोटी रुपयांच्या तुलनेत चौथ्या तिमाहीत बिकाजीनं निव्वळ नफ्यात २०० टक्के वाढ नोंदवली आहे. कंपनीला निव्वळ नफा आता ११६.२८ कोटी झाला आहे.
चौथ्या तिमाहीत या कंपनीच्या निव्वळ नफ्यात १०६८.६७ कोटी रुपयांची वाढ झाली आहे आणि ५१५.५६ च्या निव्वळ विक्रीत ९९०.१७ टक्क्यांची मोठी झेप घेतली आहे.
(डिस्क्लेमर : हा लेख केवळ माहितीसाठी देण्यात आला आहे. हा कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते. त्यामुळं गुंतवणूक करण्याआधी आपल्या व्यक्तिगत सल्लागाराशी चर्चा करावी.)