Stocks in focus : एलआयसीनं विकले महानगर गॅसमधील २० लाखांपेक्षा जास्त शेअर्स; आता काय होणार?-stocks in focus lic trims stake in mahanagar gas limited by 2 ,बिझनेस बातम्या
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Stocks in focus : एलआयसीनं विकले महानगर गॅसमधील २० लाखांपेक्षा जास्त शेअर्स; आता काय होणार?

Stocks in focus : एलआयसीनं विकले महानगर गॅसमधील २० लाखांपेक्षा जास्त शेअर्स; आता काय होणार?

Sep 30, 2024 02:18 PM IST

LIC trims stake in Mahanagar Gas : देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसीनं महानगर गॅस लिमिटेडमधील आपला हिस्सा मोठ्या प्रमाणावर कमी केला आहे. काय होऊ शकतात याचे परिणाम? पाहूया

Stocks in focus : एलआयसीनं विकले महानगर गॅसमधील २० लाखांपेक्षा जास्त शेअर्स; आता काय होणार?
Stocks in focus : एलआयसीनं विकले महानगर गॅसमधील २० लाखांपेक्षा जास्त शेअर्स; आता काय होणार?

Share Market news : देशातील सर्वात मोठी विमा कंपनी भारतीय आयुर्विमा महामंडळानं (LIC) महानगर गॅस लिमिटेडमधील आपला हिस्सा कमी करण्याची घोषणा केली आहे. शुक्रवारी, २७ सप्टेंबर रोजी शेअर बाजाराला दिलेल्या औपचारिक पत्रात ही माहिती देण्यात आली.

एलआयसीनं महानगर गॅसमधील आपला हिस्सा ८९,१९,२३६ शेअर्सवरून ६८,५४,२६४ शेअर्सपर्यंत कमी केला आहे. या कपातीमुळं महानगर गॅस लिमिटेडच्या पेड-अप कॅपिटलमध्ये एलआयसीच्या हिश्श्यात ९.०३० टक्क्यांवरून ६.९३९ टक्क्यांपर्यंत घट झाली आहे.

सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन, २०१५ च्या रेग्युलेशन ३० च्या अनुषंगानं हा खुलासा करण्यात आला आहे.

एलआयसीचे कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी अंशुल कुमार सिंह म्हणाले, 'लिस्टिंग रेग्युलेशन्सच्या रेग्युलेशन ३० नुसार, भारतीय आयुर्विमा महामंडळानं महानगर गॅस लिमिटेडच्या इक्विटी शेअर्समधील आपला हिस्सा ८९,१९,२३६ वरून ६८,५४,२६४ म्हणजेच ९.०३० टक्क्यांवरून ६.९३९ टक्क्यांपर्यंत कमी केला आहे.

भारतातील सर्वात मोठ्या संस्थात्मक गुंतवणूकदारांपैकी एक असलेल्या एलआयसीच्या या निर्णयामुळं महानगर गॅस लिमिटेडच्या बाजारपेठेच्या गतिशीलतेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. किरकोळ गुंतवणूकदार अनेकदा संस्थात्मक गुंतवणूकदारांचं अनुकरण करत असतात. एलआयसीच्या या निर्णयानंतर ते होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

महानगर गॅसच्या शेअरच्या किमतीचा इतिहास

महानगर गॅसच्या शेअरची किंमत वार्षिक आधारावर (YTD) ८५ टक्क्यांहून अधिक वाढली आहे. महिनाभरात महानगर गॅसच्या शेअरच्या किमती तब्बल ७ टक्क्यांनी वाढल्या आहेत. मागील वर्षभरात महानगर गॅसच्या शेअरनं गुंतवणूकदारांना जवळपास ७५ टक्के परतावा दिला आहे. बीएसईच्या आकडेवारीनुसार, महानगर गॅसच्या शेअरचा भाव सोमवारी, ३० सप्टेंबर रोजी एनएसईवर किंचित घसरून १९३८.४५ रुपयांवर व्यवहार करत आहे.

 

(डिस्क्लेमर: या लेखात दिलेली मते आणि शिफारशी वैयक्तिक विश्लेषकांच्या आहेत. हे मिंटच्या मतांचे प्रतिनिधित्व करत नाहीत. आम्ही गुंतवणूकदारांना सल्ला देतो की त्यांनी गुंतवणुकीचा कोणताही निर्णय घेण्यापूर्वी प्रमाणित तज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner
विभाग