मराठी बातम्या  /  Business  /  Stock To Watch 4 Companies Share This Week Including Reliance Tds Power

Stocks to Watch : चालू आठवड्यात ‘या’ शेअर्सवर ठेवा नजर; करू शकतात मालामाल

stocks to watch HT
stocks to watch HT
Kulkarni Rutuja Sudeep • HT Marathi
Mar 06, 2023 01:49 PM IST

Stocks to watch this week : गेल्या आठवड्यात शेअर बाजार तेजीसह बंद झाला होता. सेंन्सेक्समध्ये १.५४ टक्के आणि निफ्टीमध्ये १.५७ टक्के उसळी पहायला मिळाली. या आठवड्यात तज्ज्ञांची पसंती ही रिलायन्ससह या चार कंपन्यांच्या स्टाॅक्सवर असणार आहे.

stocks to watch : गेल्या आठवड्यात शुक्रवारी भारतीय शेअर बाजार तेजीसह बंज झाले. निफ्टी १.५७ टक्के तेजीसह १७,५९४.३५ च्या अंश पातळीवर बंद झाले. तर सेन्सेक्स १.५३ अंश वाढीसह अंदाजे ५९८०८.९७ अंशांवर बंद झाले. निफ्टीमध्ये सरकारी बँकेचा इंडेक्स ५.४ टक्के तेजीसह टाॅप गेनर होता. त्याशिवाय निफ्टी मेटल ३.५५ टक्के आणि निफ्टी बँकमध्ये २.१३ टक्के तेजी पहायला मिळाली. उदयापासून (दि.६) सुरु होणाऱ्या नव्या ट्रेडिंग सेशनमध्ये कोणते ४ स्टाॅक्स चांगला परतावा देऊ शकतात त्याबद्दल थोडक्यात -

ट्रेंडिंग न्यूज

हेज्डचे संस्थापक आणि सीईओ राहूल घोष यांनी २ स्टाॅक्सबद्दल आश्वासकता व्यक्त केली आहे. हे स्टाॅक्स या आठवड्यात चांगला परतावा देऊ शकतात. पाहूया टार्गेट प्राईस बद्दल

रिलायन्स (Reliance stocks ) - चार्टमध्ये रिलायन्स शाॅर्ट टर्मसाठी चांगला परफाॅर्मन्स दिसत आहे. तज्ज्ञांच्या मते स्टाॅक्सला २४९५ च्या पातळीपर्यंत होल्ड करण्याचा सल्ला दिला आहे. गेल्या महिन्याभरात रिलायन्सच्या शेअर्समध्ये तीन टक्क्यांपेक्षा अधिक तेजी आहे.

कॅनरा बँक (Canara bank stocks ) - आठवड्याच्या चार्टमध्ये हा स्टाॅक चांगला परताला देत असल्याचे दिसत आहे. गेल्या आठवड्यात कॅनरा बँक बुलिश कॅडल पॅटर्न्सवर बंद झाला होता. यामुळे जो कोणी २९० रुपयांच्या पातळीवर गुंतवणूक करत असेल तो ३२० पर्यंत होल्ड करु शकतो. तर स्टाॅप लाॅस २७५ रुपये आहे. गेल्या ६ महिन्यात या बँकेच्या शेअर्समध्ये २० टक्क्यांपेक्षा अधिक तेजी पहायला मिळाली आहे.

अरिहंत कॅपिटलचे वरिष्ठ सल्लागार रतनेश गोयल यांच्या म्हणण्यानुसार, पुढील दोन स्टाॅक्सवर नजर ठेवावी लागणार आहे.

हरिओम पाईप्स (Hariom Pipes) - शुक्रवारी कंपनीच्या शेअर्समध्ये ८ टक्क्यापेक्षा अधिक वाढ दिसली. ३६० रुपयांच्या स्टाॅप लाॅसवर नजर ठेवत हा स्टाॅक ५०० ते ५५० रुपये प्रती शेअर्सच्या पातळीवर जाऊ शकतो.

टीडीएस पावर (TDS power ) - या स्टाॅक्सची किंमत शुक्रवारीही ८ टक्क्यांपेक्षा अधिक वाढलेली दिसली. यानंतर कंपनीच्या शेअर्सचा भाव एनएसईवर १५४.९५ रुपयांच्या पातळीवर पोहोचला होता. तज्ज्ञांनी १७५ ते १९० रुपयांच्या टार्गेट प्राईससह १३५ रुपयांच्या स्टाॅप लाॅस निश्चित केला आहे.

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग