Share Market News Updates : आठवड्याच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी शेअर मार्केटचा मूड सकारात्मक राहील असा अंदाज आहे. त्या पार्श्वभूमीवर मार्केट एक्सपर्ट्सनी खरेदीसाठी काही शेअर सुचवले आहेत.
गुरुवारी पुन्हा एकदा शेअर बाजारात घसरण पाहायला मिळाली. निफ्टी फिफ्टी निर्देशांक ०.६९ टक्क्यांच्या वाढीसह २३५२६.५० अंकांवर बंद झाला. तर सेन्सेक्स ०.६८ टक्क्यांच्या घसरणीसह ७७६२०.२१ अंकांवर बंद झाला. बँक निफ्टी घसरणीनंतर ४९,५०३.५० वर बंद झाला. रिअल्टी, एनर्जी आणि आयटी अशा जवळपास सर्वच क्षेत्रात घसरण झाली.
कोटक सिक्युरिटीजचे इक्विटी रिसर्च हेड श्रीकांत चौहान यांनी बाजाराच्या मूडवर भाष्य केलं आहे. 'सध्याचा बाजार कमकुवत आहे, पण आतापर्यंत बरीचशी विक्री झाली आहे. त्यामुळं पुन्हा एकदा मार्केट सकारात्मक उसळी घेईल अशी आशा आहे. २३६५० अंकांचा आकडा निफ्टीसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. यापलीकडं घसरण झाल्यास निफ्टी २३४००-२३३७५ पर्यंत खाली येऊ शकतो. पण निफ्टी २३६५० अंकांपेक्षा जास्त वधारला तर तो २३७५० ते २३८०० पर्यंत पोहोचू शकतो.
असित सी मेहता इन्व्हेस्टमेंटचे हरिकेश म्हणतात की, जर बँक निफ्टी ५०,७४० च्या खाली राहिला तर गुंतवणूकदारांनी कोणत्याही बाऊन्स बॅकमध्ये नफा बुक करणं हिताचं राहील.
मार्केट एक्स्पर्ट सुमित बागरिया म्हणतात की, विजया डायग्नोस्टिक सेंटर लिमिटेड १२२१.३० रुपयांना विकत घेतल्यास बरे होईल. स्टॉप लॉस ११७७ रुपये असून टार्गेट प्राइस १३१३ रुपये प्रति शेअर आहे. चार्ट पॅटर्नवर हा शेअर सकारात्मक दिसत आहे.
शेली इंजिनीअरिंग प्लॅस्टिक लिमिटेडच्या शेअरमध्ये देखील गुंतवणूक करण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे. त्यांनी या शेअरसाठी १७७७ रुपये टार्गेट प्राइस १५६५ रुपये स्टॉप लॉस दिला आहे. हा शेअर १६३०.७० रुपयांना खरेदी करता येईल.
संबंधित बातम्या