Stocks to buy in July : शेअर बाजारात तेजीचा काळ सुरू असताना नवा महिना सुरू झाला आहे. देशातील सर्वाधिक पावसाचा म्हणून ओळखला जाणारा हा महिना बाजाराच्या दृष्टीनं कसा असेल? यावेळी गुंतवणूक स्ट्रॅटेजी कशी असावी? याचा विचार नियमित गुंतवणूकदारांनी सुरू केला आहे. अशांसाठी तज्ज्ञांनी काही महत्त्वाचे शेअर सुचवले आहेत.
रिलायन्स, टाटा मोटर्स, हिरो मोटो सारखे १० मौल्यवान शेअर्स जुलैमध्ये जोरदार नफा कमावून देऊ शकतात. येत्या २ ते ३ आठवड्यांत यात ४ ते १५ टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. गेल्या आठवड्यात 'निफ्टी ५०' मध्ये २ टक्क्यांहून अधिक वाढ झाली होती. रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँक आणि महिंद्रा अँड महिंद्रा या प्रमुख कंपन्यांच्या दमदार कामगिरीमुळं ही तेजी दिसून आली.
मार्केट एक्सपर्ट्सनी सध्या मोठ्या आणि तांत्रिकदृष्ट्या मजबूत शेअर्सवर सट्टा लावण्याचा सल्ला देत आहेत. अनेक तज्ज्ञांच्या शिफारशींच्या आधारे पुढील २ ते ३ आठवड्यांत १५ टक्क्यांपर्यंत वाढू शकणारे १० शेअर्स इथं देत आहोत.
रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर ३१०० ते ३,०३८ रुपयांच्या दरम्यान खरेदी करता येईल. हा शेअर ३,२४० ते ३,३३० रुपयांपर्यंत जाऊ शकतो. २,९८५ रुपये स्टॉप लॉस लावून हा व्यवहार करता येईल. सुमारे ६ टक्के वाढीची अपेक्षा आहे.
सोलारा अॅक्टिव्ह फार्मा सायन्सेस मागील सत्रात ५४४.९० रुपयांवर बंद झाला होता. हा शेअर ५२५ ते ५१५ च्या रेंजमध्ये खरेदी करता येईल. यात १५ टक्क्यांची वाढ अपेक्षित असून हा शेअर ६०० ते ६२५ रुपयांवर जाऊ शकतो. ४८० रुपयांचा स्टॉप लॉस लावता येईल.
अपोलो टायर्स हा शेअर ५३५ ते ५२५ च्या रेंजमध्ये घेता येईल. यात १० टक्क्यांची वाढ अपेक्षित असून टार्गेट प्राइस ५७४ ते ५९५ रुपये आहे. ५०८ रुपयांवर स्टॉप लॉस लावावा.
फॉल (भारत) या शेअरमध्ये १२ टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे. १३२० ते १२९४ च्या दरम्यान खरेदी केल्यास उत्तम राहील. हा शेअर १४६० ते १५०० रुपयांवर जाऊ शकतो. या शेअरला १२३० रुपयांचा स्टॉप लॉस लावावा.
नेस्ले इंडियाचा शेअर २५३० ते २५५५ च्या रेंजमध्ये मिळाल्यास तो घेता येईल. यात ४ टक्के वाढीची शक्यता असून शेअरचा भाव २६५० पर्यंत जाऊ शकतो. २४८० रुपयांवर स्टॉप लॉस लावून व्यवहार करावा.
एसबीआय लाइफ इन्शुरन्स हा शेअर सध्या १४९९ रुपयांवर ट्रेड करत आहे. हा शेअर १४७५ ते १४९५ च्या रेंजमध्ये घेऊन होल्ड करता येईल. यात ५ टक्क्यांची वाढ अपेक्षित असून भाव १,५६५ रुपयांवर जाऊ शकतो. १,४४५ रुपये हा स्टॉप लॉस लावावा.
ओएनजीसी कंपनीचा शेअर २७२ ते २७६ च्या रेंजमध्ये खरेदी करता येईल. यात ९ टक्के वाढीची क्षमता असून तो ३०० रुपयांपर्यंत जाऊ शकतो.
टाटा मोटर्सचा शेअर पुढच्या काही दिवसांत १११० रुपयांवर जाऊ शकतो. म्हणजेच हा शेअर १२ टक्क्यांपर्यंत वाढू शकतो.
कोलगेट पामोलिव (इंडिया) च्या शेअरचा भाव सध्या २८७४ च्या आसपास आहे. याची टार्गेट प्राइस ३०७० रुपये आहे. २७२० रुपयांचा स्टॉप लॉस लावून हा शेअर खरेदी करता येईल.
हीरो मोटोकॉर्पचा शेअर या महिन्यात १० टक्के परतावा देऊ शकतो. या शेअरची सध्याची किंमत ५,६५० रुपये आहे. हा शेअर १० टक्क्यांनी वाढून तो ६१५० रुपयांवर जाऊ शकतो.
(डिस्क्लेमर : हे वृत्त केवळ माहितीपर आहे. या लेखातील तज्ज्ञांच्या शिफारशी, सूचना आणि मतं ही त्यांची स्वतःची आहेत, हिंदुस्तान टाइम्स मराठीची नाहीत. हा कोणत्याही प्रकारचा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते. गुंतवणूक करण्याआधी आपल्या आर्थिक सल्लागाराशी चर्चा करावी.)
संबंधित बातम्या