Dividend Stocks : नफ्यात वाढ होताच कंपनीची मोठी घोषणा, एका शेअरवर देणार ३०० रुपये लाभांश, तुम्हाला किती मिळणार?-stock market news page industries declares dividend of rs 300 per share after big profit q1 results ,बिझनेस बातम्या
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Dividend Stocks : नफ्यात वाढ होताच कंपनीची मोठी घोषणा, एका शेअरवर देणार ३०० रुपये लाभांश, तुम्हाला किती मिळणार?

Dividend Stocks : नफ्यात वाढ होताच कंपनीची मोठी घोषणा, एका शेअरवर देणार ३०० रुपये लाभांश, तुम्हाला किती मिळणार?

Aug 08, 2024 05:23 PM IST

Page Industries Ltd Dividend : शेअर बाजारातील महागड्या शेअरपैकी एक असलेल्या पेज इंडस्ट्रीजनं गुंतवणूकदारांसाठी भरघोस लाभांश जाहीर केला आहे.

Dividend Stocks : नफ्यात वाढ होताच कंपनीची मोठी घोषणा, एका शेअरवर देणार ३०० रुपये लाभांश, तुम्हाला किती मिळणार?
Dividend Stocks : नफ्यात वाढ होताच कंपनीची मोठी घोषणा, एका शेअरवर देणार ३०० रुपये लाभांश, तुम्हाला किती मिळणार?

Page Industries Ltd Divdend : शेअर मार्केटमधील सर्वात महागड्या शेअरपैकी एक असलेल्या पेज इंडस्ट्रीज लिमिटेडनं आर्थिक वर्ष २०२५ च्या पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. पहिल्या तिमाहीत कंपनीचं उत्पन्न आणि नफाही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळं खूष झालेल्या कंपनीच्या संचालक मंडळानं आपल्या शेअरहोल्डर्ससाठी दणदणीत लाभांश जाहीर केला आहे.

कंपनी बोर्डाच्या निर्णयानुसार, गुंतवणूकदारांना प्रत्येक शेअरमागे तब्बल ३०० रुपयांचा लाभांश मिळणार आहे. सकारात्मक तिमाही निकालाबद्दल कंपनीनं आनंद व्यक्त केला आहे. आमच्या ब्रँडवर ग्राहकांचा विश्वास अधिकाधिक दृढ होत आहे. ग्राहक कपडे आणि ॲक्सेसरीजवर खर्च करत आहेत. ई-कॉमर्स आणि डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे बाजारपेठेत वाढ झाली आहे, असं विश्लेषण कंपनीनं केलं आहे.

पेज इंडस्ट्रीजचा नफा किती?

आधीच्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या जून तिमाहीत कंपनीच्या नफ्यात तुलनेत ४.४३ टक्के वाढ झाली आहे. यावेळी कंपनीला १६५ कोटी रुपयांचा नफा झाला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत हा नफा १५८ कोटी रुपये इतका होता.

कंपनीच्या उत्पन्नातही वाढ झाली आहे. ही वाढ ३.९ टक्के इतकी आहे. आर्थिक वर्ष २०२५ च्या पहिल्या तिमाहीत कंपनीचं उत्पन्न १२७८ कोटी रुपये आहे. मागील आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत उत्पन्नाचा आकडा १२२९ कोटी होता.

ऑपरेटिंग नफा म्हणजेच एबिटा ( EBITDA - Earnings before Interest tax and depreciation ) मध्ये वर्षभरात १.६ टक्के वाढ झाली आहे. व्यवसाय वर्ष २०२५ च्या जून तिमाहीत कंपनीचा एबिटा २४२ कोटी होता. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीचा नफा २३८ कोटी होता. मार्जिनमध्येही वर्ष-दर-वर्षाच्या आधारावर विस्तार होताना दिसत आहे. पहिल्या तिमाहीत कंपनीचं मार्जिन १९.४ टक्क्यांच्या तुलनेत १९.१ टक्के राहिली आहे.

कंपनीनं केली लाभांशाची घोषणा

कंपनीनं भागधारकांसाठी प्रति शेअर ३०० रुपये या दरानं लाभांश जाहीर केला आहे. गुंतवणूकदारांना प्रत्येक शेअरवर ३०० रुपये मिळणार आहेत. २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी कंपनीनं जाहीर केलेला हा पहिला अंतरिम लाभांश आहे. यासाठी १७ ऑगस्ट २०२४ ही रेकॉर्ड डेट निश्चित करण्यात आली आहे. हा लाभांश ६ सप्टेंबर २०२४ रोजी किंवा त्यापूर्वी दिला जाईल.

शेअरची स्थिती काय?

पेज इंडस्ट्रीजच्या शेअरचा सध्याचा भाव ४०३०१ रुपये आहे. हा शेअर आज २.४० टक्क्यांनी घसरून बंद झाला. मागच्या सहा महिन्यात शेअरनं गुंतवणूकदारांना जवळपास १० टक्के परतावा दिला आहे.

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त माहितीपर आहे. हा कोणत्याही प्रकारचा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते. त्यामुळं गुंतवणुकीचा कोणताही निर्णय घेण्याआधी आपल्या आर्थिक सल्लागाराशी चर्चा करावी.)

विभाग