मराठी बातम्या  /  Business  /  Stock Market News: Borosil Renewables Share Climbed To 480 Rupee Level From 11 Paisa

Multibagger Stock : शेअर असावा तर असा! एक लाखाचे झाले ४३ कोटी

Share Market
Share Market
Ganesh Pandurang Kadam • HT Marathi
Feb 17, 2023 01:31 PM IST

Borosil Renewables Share Price : बोरोसिल रिन्युएबल्स या कंपनीनं गुंतवणूकदारांना गेल्या काही वर्षांत छप्परफाड नफा मिळवून दिला आहे.

Borosil Renewables Share Price : निर्णय योग्य असेल आणि थांबण्याची तयारी असेल तर शेअर बाजार काय चमत्कार करू शकतो, याचं उदाहरण बोरोसिल रिन्युएबल्स कंपनीनं दाखवून दिलं आहे. कधी काळी ११ पैशांचा असलेला हा शेअर आज ४५० रुपयांवर पोहोचला असून यात गुंतवणूक करणारा छप्परफाड नफा झाला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

बोरोसिल रिन्युएबल्सच्या शेअरनं २० वर्षांच्या कालावधीत गुंतवणूकदारांना ४ लाख टक्क्यांपेक्षाही जास्त नफा मिळवून दिला आहे. या मल्टीबॅगर कंपनीच्या शेअर्सची ५२ आठवड्यांचा उच्चांक ८३३ रुपये आहे. तर, कंपनीनं ५२ आठवड्यांचा नीचांक ४३८.१० रुपये इतका नोंदवला आहे.

बोरोसिल रिन्युएबल्सचा एक शेअर ५ मार्च २००३ रोजी ११ पैशांना होता. आज, १७ फेब्रुवारी २०२३ रोजी हाच शेअर ४७६ रुपयांवर व्यवहार करत आहेत. एखाद्या व्यक्तीनं ५ मार्च २००३ रोजी बोरोसिल रिन्युएबल्सच्या शेअर्समध्ये १ लाख रुपये गुंतवले असतील आणि गुंतवणूक कायम ठेवली असेल तर आज त्याचे पैसे ४३.८० कोटी रुपये झाले असतील. विशेष म्हणजे या आकडेमोडीत बोरोसिल रिन्युएबल्सनं आतापर्यंत दिलेले बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिटचा समावेश नाही. ऑगस्ट २०१८ मध्ये कंपनीनं ३:१ या प्रमाणात बोनस शेअर्स दिले होते.

दहा वर्षांत दिला ५ हजार टक्क्यांपेक्षा जास्त परतावा

बोरोसिल रिन्युएबल्सच्या शेअर्सनी मागच्या १० वर्षांत जबरदस्त परतावा दिला आहे. १ मार्च २०१३ रोजी कंपनीचे शेअर्स मुंबई स्टॉक एक्स्चेंजवर ९ रुपयांवर व्यवहार करत होते. एखाद्या व्यक्तीनं त्यावेळी १ लाख रुपये गुंतवले असते आणि ही गुंतवणूक कायम ठेवली असती तर आता त्याची किंमत ५३.५४ लाख रुपये झाली असती. बोरोसिल रिन्युएबल्सची मार्केट कॅप सुमारे ६२७५ कोटी रुपये इतकी आहे.

तीन वर्षांत शेअरमध्ये १२०० टक्के वाढ

बोरोसिल रिन्युएबल्सच्या शेअर्सनी ३ वर्षांपेक्षा कमी कालावधीत गुंतवणूकदारांना १२६५ टक्के परतावा दिला आहे. २९ मे २०२० रोजी कंपनीचे शेअर्स ३५.१० रुपयांवर होते.

 

(सूचना: ही माहिती कंपनीच्या शेअरनं स्टॉक मार्केटमध्ये केलेल्या कामगिरीवर आधारित आहे. हा कुठल्याही प्रकारे गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते. त्यामुळं तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच गुंतवणुकीचा निर्णय घ्यावा.)