Sensex Nifty Crashed : शेअर बाजाराची आपटी! दिवसअखेर सेन्सेक्स ७७४ तर निफ्टी २०७ अंकांनी गडगडला
Stock Market updates : जागतिक बाजारपेठेकडून मिळालेले कमजोर संकेत, रुपयाची डाॅलर्सच्या तुलनेत झालेली घसरण या सर्वांचा परिणाम आज मुंबई शेअर बाजारावर झाला. सेन्सेक्समध्ये दिवसअखेर तब्बल ७७४ अंशांची तर निफ्टीतही २०७ अंशांची घसरण झाली आहे.
Sensex Crashed : आँटो आणि धातू इंडेक्स वगळता आज सर्वच सेक्टर्समध्ये जबरदस्त घसरण दिसत आहे. बाजारातील घसरणीचा आलेख अधिकच खालावत चालला आहे. निफ्टीनेही १८ हजारांची अंश पातळी तोडली आहे. निफ्टी ५० तील अंदाजे ४४ स्टाॅक्समध्ये घसरण झाली आहे. निफ्टीतील सर्व १२ बँक स्टाॅक्समध्ये घसरण झाली आहे. तर सेन्सेक्समधील ३० पैकी २५ स्टाॅक्सनी लाल बावटा कायम राखला आहे.
ट्रेंडिंग न्यूज
आज आंतरराष्ट्रीय बाजारातही सकाळी कमकूवत सुरुवात झाली. आशियाई बाजारपेठेतही संमिश्र स्थिती होती. अमेरिकन बाजारातील डाऊ जोन्स आणि नॅसडॅक्स इंडेक्समध्ये संमिश्र स्थिती कायम होती. तर दुसरीकडे जागतिक मंदीच्या संकेत आता स्पष्ट दिसू लागले आहेत. आगामी फेडरल बजेट आणि जानेवारी महिन्याअखेरीस डेरिव्हेटिव्हच्या चिंतेमुळे भारतीय शेअर बाजारात अस्थिरता निर्मणा झाली. दुपारच्या सत्रात १२ वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्समध्ये ८०० अंशांची घसऱण नोंदवत सेन्सेक्स ६०१०१ अंशपातळीवर गेला.
याच प्रमाणे निफ्टीनेही १८ हजाराची अंशपातळी तोडत त्यात अंदाजे २०४ अंशांची घसरण झाली. निफ्टी १७,८८४ च्या अंशपातळीवर घसरला. दिवसअखेर सेन्सेक्समध्ये ७७४ अंशांची घसरण नोंदवत तो अंदाजे ६०२०५ च्या अंशांवर स्थिरावला. तर निफ्टीतही अंदाजे २०७ अंशांची घट नोंदवत तो अंदाजे १७,९११ च्या अंशपातळीवर स्थिरावला.
दोन्ही निर्देशांक झालेली ही गेल्या आठवड्याभरातील सर्वात निचांकी पातळी आहे. बँक स्टाॅक्समध्ये तब्बल २ टक्क्यांची घसरण झाली आहे. याशिवाय रिअल्टी, फार्मा, एनर्जी सेक्टर्समध्येही जबरदस्त घट झाली आहे. कंपन्यांच्या बाबतीत सर्वाधिक घसरण अदानी पोर्ट्स, एसबीआय़, अदानी एन्टरप्राईज, इंडसएड बँक आणि एचडीएफसीमध्ये झाली आहे.
संबंधित बातम्या
विभाग