Why Stock Market Down Today : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी आज शेअर बाजार कोसळला आहे. सेन्सेक्स १२०० हून अधिक अंकानी तर निफ्टी ३८० पेक्षा अधिक अंकांनी घसरून ट्रेड करत आहे. बाजारातील घसरणीमागे चीनमध्ये आलेला नवीन व्हायरस हे कारण आहे.
बेंगळुरूमध्ये या व्हायरसचे दोन नवे रुग्ण सापडल्याच्या वृत्ताला इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (IMCR) नं दुजोरा दिला आहे. त्यामुळं बाजारात भीती वाढली आहे.
बाजारातील मोठ्या घसरणीमुळं लिस्टेड कंपन्यांचं मार्केट कॅप एका क्षणी ८ लाख कोटी रुपयांनी कमी झालं होतं. आज निफ्टी २४,०४५.८० अंकांवर उघडला. तर दुपारी (१२.४५ पर्यंत) निफ्टीची ४०० हून अधिक अंकांनी घसरून इंट्रा-डे नीचांकी पातळी गाठली. तेव्हा निफ्टी २३६०१.५० अंकांवर होता. सेन्सेक्स आज म्हणजेच सोमवारी ७९,२८१.६५ वर उघडला. तर १२६० हून अधिक अंकांनी घसरून तो ७७,९५९,९५ अंकांवर आला.
दुपारी १२.४५ वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार, बीएसईमधील २३५ कंपन्यांच्या शेअर्सला आज अपर सर्किटला लागलं होतं. त्याचवेळी ३९६ कंपन्यांच्या शेअरला लोअर सर्किट लागलं. निफ्टीमधील ७७ कंपन्यांचे शेअर्स अपर सर्किटमध्ये होते. तर, १४४ कंपन्यांच्या शेअर्सला लोअर सर्किट लागलं.
स्वस्तिका इन्व्हेस्टमार्ट लिमिटेडचे वरिष्ठ संशोधन तज्ज्ञ प्रवेश गौर म्हणाले, ‘चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीचे (ऑक्टोबर-डिसेंबर) निकाल या आठवड्यात जाहीर होणार आहेत. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज TCS आणि Tata Elxsi गुरुवारी, ९ जानेवारी रोजी त्यांचे आर्थिक निकाल जाहीर करतील. गुंतवणूकदारांचं लक्ष वैयक्तिक समभागांच्या कामगिरीवर असेल.’
संबंधित बातम्या