Personal Loan: पर्सनल लोनसाठी अर्ज करताय? त्यापूर्वी 'या' गोष्टींचा नक्की विचार करा, नाहीतर…
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Personal Loan: पर्सनल लोनसाठी अर्ज करताय? त्यापूर्वी 'या' गोष्टींचा नक्की विचार करा, नाहीतर…

Personal Loan: पर्सनल लोनसाठी अर्ज करताय? त्यापूर्वी 'या' गोष्टींचा नक्की विचार करा, नाहीतर…

Jul 04, 2024 04:48 PM IST

how to apply personal loan online: पर्सनल लोन घेताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत, याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

ऑनलाइन पर्सनल लोनसाठी अर्ज करण्याची सोपी पद्धत
ऑनलाइन पर्सनल लोनसाठी अर्ज करण्याची सोपी पद्धत

Personal Loan Important Points: शिक्षण, घराचे नूतनीकरण, लग्न, वैद्यकीय उपचार, कर्ज एकत्रीकरण, परदेश प्रवास इत्यादी मोठ्या खर्चाचे नियोजन करताना अनेक अडचणी समोर येतात. अशावेळी पर्सनल लोन हा अनेकांसाठी चांगला पर्याय ठरू शकते. परंतु, ऑनलाईन इन्स्टंट लोन मिळवण्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत आणि त्याची प्रक्रिया कशी असेल, याबाबत बहुतेक लोकांना पुरेशी माहिती नसल्याने ते अडचणी सापडतात.

आपण ज्या कर्ज देणाऱ्या संस्थेच्याकडून कर्ज घेत आहेत, त्यांचे नियम आणि अटी व्यवस्थित वाचल्या पाहिजेत. याशिवाय, इतर संस्था आपण कर्ज घेत असलेल्या संस्थाच्या तुलनेत किती टक्क्यांनी कर्ज देत आहेत, याचीही चौकशी केली पाहिजे, तज्ज्ञाचे मत आहे.

कर्ज घेताना कोणती काळजी घ्यावी?

१) ध्येय:

पर्सनल लोनसाठी ऑनलाइन किंवा ऑफलाइन अर्ज करण्यापूर्वी आपण ते कशासाठी घेतोय, हे निश्चित करणे आवश्यक आहे.

२) रक्कम:

आपण कोणत्या कामासाठी कर्ज घेतोय आणि त्यासाठी किती पैशांची गरज आहे, याचा हिशोब करुनच कर्जाची रक्कम ठरवा. कारण, पैसे अपुरे पडल्यानंतर तुम्हाला इतर दुसरीकडून जमा करावे लागतील.

३) बजेट:

दरमहिन्याला भराव्या लागणाऱ्या ईएमआय रकमेनुसार तुमचे उत्पन्न आणि खर्चाच्या आधारे बजेट तयार करा, ज्यामुळे तुम्ही न डगमगता सहजपणे कर्जाची परतफेड करू शकता.

४) कागदपत्रे

योग्य कर्जदार शोधल्यानंतर, कर्जासाठी अर्ज करण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधा. पडताळणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे स्कॅन आणि अपलोड करणे आवश्यक आहे.

५) ईएमआय कॅल्क्युलेटर:

हप्ते परवडणारे आणि परतफेड करता येतील की नाही, हे ठरवण्यासाठी ईएमआय कॅल्क्युलेटरचा वापर करा.

६) प्रोसेसिंग फी

कर्जदार आपल्या कर्जाच्या अर्जावर प्रक्रिया करण्यासाठी एक लहान प्रक्रिया शुल्क आकारतात. कर्जाची प्रक्रिया करण्यासाठी हे शुल्क भरणे आवश्यक आहे.

पर्सनल लोनसाठी ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक निधी सुरक्षित करण्याचा एक सोयीस्कर आणि जलद मार्ग आहे. वरील टिप्स आणि पद्धतींचे पालन करून, आपण आपले कर्ज प्रभावीपणे व्यवस्थापित करू शकता आणि परतफेड प्रक्रिया सुनिश्चित करू शकता.

 

Whats_app_banner