Intraday Shares To Buy Today : नव्या वर्षाचा पहिला दिवस नवी आशा घेऊन आला आहे. शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना या वर्षाकडून अनेक अपेक्षा आहे. या वर्षात जास्तीत जास्त हुशारीनं नफा पदरात पाडून घेण्याचे ट्रेडर्स आणि गुंतवणूकदारांचे प्रयत्न असतील. रोजच्या रोज ट्रेड करणाऱ्यांसाठी मार्केट एक्सपर्ट्सनी आज खरेदी-विक्रीसाठी ५ स्वस्त शेअर्स सुचवले आहेत.
एसएस वेल्थस्ट्रीटच्या संस्थापक आणि शेअर बाजार तज्ज्ञ सुगंधा सचदेवा, हेन्सेक्स सिक्युरिटीजचे एव्हीपी (रिसर्च) महेश एम ओझा आणि लक्ष्मीश्री इन्व्हेस्टमेंट अँड सर्व्हिसेसचे रिसर्च हेड अंशुल जैन यांनी पाच शेअर्सच्या खरेदी-विक्रीची शिफारस केली आहे. यात आयडीबीआय बँक, व्होडाफोन आयडिया, निवा बुपा हेल्थ इन्शुरन्स, जय भारत मारुती आणि जेटीएल इंडस्ट्रीज यांचा समावेश आहे.
आयडीबीआय बँक ७६ रुपयांना खरेदी करा, लक्ष्य ७८.७० रुपये ठेवा आणि स्टॉपलॉस ७४.५० रुपये ठेवा.
व्होडाफोन आयडियाचा शेअर ७.७० रुपयांना खरेदी करा. लक्ष्य ९.५० रुपये ठेवा आणि स्टॉपलॉस ६.६० रुपये ठेवा.
‘जय भारत मारुती’ हा शेअर ८६ रुपयांपर्यंत खरेदी करा. टार्गेट ९१ रुपये ठेवा आणि स्टॉप लॉस ८३ रुपये ठेवा.
जेटीएल इंडस्ट्रीज ९६ रुपयांना विकत घ्या, टार्गेट १०३ रुपये ठेवा आणि स्टॉपलॉस ९३ रुपये ठेवा.
निवा बुपा हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडचा ८३ ते ८४.५० रुपयांना खरेदी करा. लक्ष्य किंमत ८७-९१-९४-१०० रुपये ठेवा आणि स्टॉप लॉस ८० रुपये ठेवा.
भारतीय शेअर बाजारानं २०२४ मध्ये सुमारे ८.५ टक्के परतावा दिला. ३१ डिसेंबर रोजी बीएसईचा ३० शेअर्सचा सेन्सेक्स १०९.१२ अंकांनी घसरून ७८,१३९.०१ वर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ०.१० अंकांच्या घसरणीसह २३,६४४.८० अंकांवर बंद झाला. देशांतर्गत शेअर बाजाराचे निर्देशांक निफ्टी ५० आणि सेन्सेक्स अनुक्रमे ८.८ टक्के आणि ८.२ टक्क्यांनी वधारले.
संबंधित बातम्या