Starbucks Ceo Salary: जगात सध्या एका कंपनीच्या सीईओच्या पगाराची चर्चा सुरू आहे. या कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला चार महिन्याचा पगार ९६ दशलक्ष डॉलर (सुमारे ७९६.८ कोटी रुपये) पगार मिळाला आहे. अमेरिकेच्या कॉर्पोरेट जगतातील हा सर्वाधिक पगार समजला जात आहे. सीईओ ब्रायन निकोल असे या सीईओचे नाव असून ते स्टारबक्स कॉर्पचे मुख्यकार्यकारी अधिकारी आहे. २०२४ च्या ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, निकोल यांचं पॅकेज अॅपलचे टिम कुक आणि गुगलचे सुंदर पिचाई यांच्यापेक्षा जास्त आहे.
निकोलच्या पगारापैकी ९४ टक्के रक्कम ही स्टॉकमधून मिळाली आहे. स्टारबक्सने सप्टेंबर २०२४ मध्ये लक्ष्मण नरसिम्हन यांच्या जागी ब्रायन निकोल यांची कंपनीचे नवे अध्यक्ष आणि सीईओ म्हणून नियुक्ती केली होती. सप्टेंबर २०२४ मध्ये स्टारबक्सची धुरा हाती घेतल्यावर एका महिन्याच्या आत निकोलला ५ दशलक्ष डॉलर्सचा साइन-ऑन बोनस देखील मिळाला.
निकोल आता अमेरिकेच्या टॉप-२० पेड सीईओंमध्ये सामील झाली आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, त्याची वार्षिक कमाई ११३ दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे ९३८ कोटी रुपये एवढी आहे. त्यांच्या पॅकेजमध्ये आधीचा नियोक्ता, चिपोटले मेक्सिकन ग्रिल इंकशी संबंधित इक्विटी फायद्यांचा देखील समावेश आहे. स्टारबक्सने दिलेल्या माहितीनुसार, निकोलच्या नुकसान कमाईमध्ये १४३,००० एचआरए, तर कॅलिफोर्नियातील घरातून सिएटल मुख्यालयात जाण्यासाठी स्पेशल विमान आहे. यासाठी कंपनी ७२ हजार डॉलर व कंपनीच्या विमानाच्या वैयक्तिक वापरासाठी १९,००० डॉलर्सचा खर्च करते.
स्टारबक्सचे कार्यालय सिएटल येथे असून निकोल कॅलिफोर्निया येथे राहतात. दोन्ही शहरांमधील अंतर १६०० किमी आहे. ऑफिसला जाण्यासाठी त्यांना आठवड्यातून ३ दिवस खास विमानातून प्रवास करावा लागतो. त्यासाठी कंपनीने त्यांना खासगी जेट देखील उपलब्ध करून दिले आहे.
ब्रायन यांना अनेक सुविधा आणि मोठं पॅकेज दिलं. त्यांच्या नेमणुकीची देखील मोठी चर्चा झाली होती. कंपनी २०२३ पासून हायब्रीड वर्क कल्चर राबवत असून यानंतर निकोललाही आठवड्यातून तीनच दिवस कार्यालयात यावे लागते.
संबंधित बातम्या