Stock Market News : शेअर बाजारात लिस्ट झालेल्या दोन्ही शेअरनी गुंतवणूकदारांना खूश करून टाकलं आहे. यातील दुसरा आयपीओ स्टँडर्ड ग्लास लाइनिंगचा असून या कंपनीचा शेअर २५.७१ टक्क्यांनी वधारून १७६ रुपयांवर लिस्ट झाला आहे. तर, एनएसईवर कंपनीची लिस्टिंग २२.८६ टक्के प्रीमियमसह १७२ रुपये प्रति शेअर झाली आहे.
स्टँडर्ड ग्लास लाइनिंगच्या आयपीओसाठी १३३ ते १४० रुपये प्रति शेअर असा दरपट्टा निश्चित करण्यात आला होता. कंपनीनं एकूण १०७ शेअर्सचा लॉट बनवला होता. त्यासाठी गुंतवणूकदारांना किमान १४,९८० रुपयांची गुंतवणूक करावी लागली. लिस्टिंग नंतर कंपनीच्या शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळाली आहे. सकाळी १०.०३ वाजता कंपनीचे शेअर्स २ टक्क्यांहून अधिक घसरणीसह व्यवहार करत होते.
स्टँडर्ड ग्लास लाइनिंगचा आयपीओ आकार ४१०.०५ कोटी रुपये होता. कंपनीच्या आयपीओमध्ये ऑफर फॉर सेल आणि नवीन इश्यूचाही समावेश होता. ऑफर फॉर सेल अंतर्गत कंपनीनं १.५० कोटी नवे शेअर्स आणि १.४३ कोटी शेअर्स जारी केले होते. हा आयपीओ ६ जानेवारी ते ८ जानेवारी या कालावधीत गुंतवणूकदारांसाठी खुला होता.
सब्सक्रिप्शन ओपनिंगदरम्यान आयपीओ १८५ पेक्षा जास्त पट सब्सक्राइब झाला होता. कंपनीचा आयपीओ सर्वाधिक क्यूआयबी श्रेणीत सब्सक्राइब करण्यात आला होता. या श्रेणीत कंपनीचा आयपीओ ३०० पेक्षा जास्त पट सब्सक्राइब झाला होता. तर रिटेल कॅटेगरीमध्ये आयपीओ ६५ पटीहून अधिक सब्सक्राइब झाला होता.
कंपनीचा आयपीओ ३ जानेवारी रोजी अँकर गुंतवणूकदारांसाठी खुला करण्यात आला होता. कंपनीनं अँकर गुंतवणूकदारांकडून १२३.०२ कोटी रुपये उभे केले होते. ही कंपनी फार्मा सेक्टर आणि केमिकल सेक्टरसाठी उपकरणं बनवते.
संबंधित बातम्या