IPO News : दोन दिवसांत ३५ पट सबस्क्राइब झाला आयपीओ! ग्रे मार्केटमध्येही आहे बोलबाला! गुंतवणुकीची आज शेवटची संधी
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  IPO News : दोन दिवसांत ३५ पट सबस्क्राइब झाला आयपीओ! ग्रे मार्केटमध्येही आहे बोलबाला! गुंतवणुकीची आज शेवटची संधी

IPO News : दोन दिवसांत ३५ पट सबस्क्राइब झाला आयपीओ! ग्रे मार्केटमध्येही आहे बोलबाला! गुंतवणुकीची आज शेवटची संधी

Jan 08, 2025 01:35 PM IST

Standard Glass Lining IPO News : पहिल्या दोन दिवसांत तब्बल ३५ पट सबस्क्राइब झालेला स्टँडर्ड ग्लास लाइनिंगच्या आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याची आज शेवटची संधी आहे.

दोन दिवसांत ३५ पट सबस्क्राइब झाला आयपीओ! ग्रे मार्केटमध्येही आहे बोलबाला! गुंतवणुकीची आज शेवटची संधी
दोन दिवसांत ३५ पट सबस्क्राइब झाला आयपीओ! ग्रे मार्केटमध्येही आहे बोलबाला! गुंतवणुकीची आज शेवटची संधी

IPO News in Marathi : स्टँडर्ड ग्लास लाइनिंग कंपनीचा आयपीओ पहिल्या दोन दिवसांत ३५ पट सबस्क्राइब झाला आहे. ग्रे मार्केटमध्येही कंपनीच्या शेअरचा बोलबाला असल्यानं लिस्टिंगची उत्सुकता वाढली आहे. या आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा आज शेवटचा दिवस आहे.

स्टँडर्ड ग्लास लाइनिंगचा आयपीओ रिटेल गुंतवणूकदार श्रेणीत सर्वाधिक सबस्क्राइब करण्यात आला आहे. दोन्ही दिवसांत किरकोळ श्रेणीत ३३.९७ पट वाढ झाली आहे. तर क्यूआयबी श्रेणीत ४.६३ पट आणि एनआयआय श्रेणीत ८०.३८ पट सब्सक्राइब झाला आहे. हा आयपीओ ६ जानेवारी रोजी खुला झाला होता.

आयपीओआधी मिळवले १२३ कोटी

कंपनीचा आयपीओ ४१०.०५ कोटी रुपयांचा आहे. आयपीओमध्ये नवीन इश्यूद्वारे आणि ऑफर फॉर सेल अंतर्गत शेअर्स जारी केले जातील. नव्या इश्यूच्या माध्यमातून कंपनी १.५० कोटी शेअर्स जारी करेल आणि ऑफर फॉर सेल अंतर्गत १.४३ कोटी शेअर्स जारी करेल. कंपनीनं अँकर गुंतवणूकदारांकडून १२३ कोटी रुपये उभे केले आहेत. हा आयपीओ अँकर गुंतवणूकदारांसाठी ३ जानेवारी रोजी खुला करण्यात आला होता.

१३ जानेवारीला लिस्टिंग

स्टँडर्ड ग्लास लाइनिंग्स आयपीओसाठी १३३ ते १४० रुपये प्रति शेअर असा दरपट्टा निश्चित करण्यात आला आहे. कंपनीनं एकूण १०७ शेअर्सचा लॉट बनवला आहे. गुंतवणूकदारांना किमान १४,९८० रुपये गुंतवावे लागणार आहेत. हा आयपीओ १३ जानेवारीला बीएसई आणि एनएसईवर लिस्ट होणार आहे.

जीएमपी किती?

इन्व्हेस्टर्स गेनच्या अहवालानुसार, ग्रे मार्केटमध्ये कंपनीचं स्थान मजबूत दिसत आहे. हा आयपीओ आज ९६ रुपयांच्या प्रीमियमवर व्यवहार करत आहे. कालच्या तुलनेत आज कंपनीच्या जीएमपीमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. सर्वाधिक जीएमपी ४ जानेवारीला झाला होता. त्यावेळी हा आयपीओ ९७ रुपयांच्या प्रीमियमवर व्यवहार करत होता.

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त केवळ माहितीपर आहे. तज्ज्ञांची मतं, सूचना व शिफारशी त्यांच्या वैयक्तिक आहेत. हिंदुस्तान टाइम्स मराठी कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला देत नाही. त्यामुळं गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)

Whats_app_banner