Stock market : श्री अधिकारी ब्रदर्स टेलिव्हिजन नेटवर्कच्या समभागांनी गेल्या वर्षभरात गुंतवणूकदारांना छप्परफाड परतावा दिला आहे. गेल्या वर्षभरात श्री अधिकारी ब्रदर्सचे समभाग ३१ हजार टक्क्यांनी वधारले आहेत.
मुंबई शेअर मार्केटमध्ये बुधवारी कंपनीच्या शेअरनं ४६१.८० रुपयांचा उच्चांक गाठला. हा शेअरचा ५२ आठवड्यांचा नवा उच्चांक आहे. श्री अधिकारी ब्रदर्सच्या शेअर्सचा ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर १.३९ रुपये आहे. कंपनीचे मार्केट कॅप ११७१ कोटी रुपयांवर पोहोचलं आहे.
गेल्या वर्षभरात श्री अधिकारी ब्रदर्सचे समभाग ३१७.४८ टक्क्यांनी वधारले आहेत. ४ सप्टेंबर २०२३ रोजी कंपनीचा शेअर १.४५ रुपयांवर होता. हा शेअर आज, १४ ऑगस्ट २०२४ रोजी श्री अधिकारी ब्रदर्सचा शेअर ४६१.८० रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या २ वर्षात श्री अधिकारी ब्रदर्सच्या शेअर्समध्ये २६००० टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. १६ ऑगस्ट २०२२ रोजी कंपनीचा शेअर १.७६ रुपयांवर होता. तो आज ४६० रुपयांच्या पुढं गेला आहे.
श्री अधिकारी ब्रदर्सच्या शेअरमध्ये या वर्षी आतापर्यंत १३५०० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला १ जानेवारी २०२४ रोजी श्री अधिकारी ब्रदर्सचा शेअर ३.३९ रुपयांवर होता. १४ ऑगस्ट २०२४ रोजी कंपनीचा शेअर ४६१.८० रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या सहा महिन्यांत श्री अधिकारी ब्रदर्सचे समभाग ९५८ टक्क्यांनी वधारले आहेत. या कालावधीत कंपनीचे शेअर्स ४३.६४ रुपयांवरून ४६० रुपयांवर पोहोचले आहेत. गेल्या महिनाभरात श्री अधिकारी ब्रदर्सच्या शेअरमध्ये ५१ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. या काळात कंपनीचा शेअर ३०५.१० रुपयांवरून ४६१.८० रुपयांवर पोहोचला आहे.
आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी बुधवारी शेअर बाजारात पुन्हा चढ-उतार पाहायला मिळाला. बीएसई सेन्सेक्स १४९.८५ अंकांनी वधारून ७९१०५.८८ अंकांवर बंद झाला तर, निफ्टी ४.७ अंकांनी वधारून २४,१४३.७५ अंकांवर बंद झाला. बीएसई निर्देशांकातील ३० समभागांमध्ये टीसीएस, एचसीएल, इन्फोसिस, टेक महिंद्रा, महिंद्रा अँड महिंद्रा, भारती एअरटेल, टाटा मोटर्स आणि एसबीआयचे समभाग सर्वाधिक वधारले. दिवसअखेर अदानी पोर्ट्स आणि पॉवरग्रिडसह अल्ट्राटेक, जेएसडब्ल्यू आणि टाटा स्टीलचे समभाग घसरून बंद झाले.