Sony Republic Day Sale : दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं वेगवेगळ्या ब्रँड्सकडून सेलची घोषणा केली जाते. यंदाचा प्रजासत्ताक दिनही त्यास अपवाद नाही. अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, विजय सेल्सप्रमाणेच सोनी कंपनीचा रिपब्लिक डे सेल सुरू झाला आहे. या सेलमध्ये टीव्ही, स्पीकरसह अनेक वस्तू अत्यंत स्वस्तात मिळत आहेत.
सोनीच्या सेलमध्ये स्मार्ट टीव्ही, पर्सनल ऑडिओ आणि होम ऑडिओ उत्पादनांवर बंपर डिस्काउंट आहे. कंपनीच्या ऑनलाइन स्टोअरवर आणि विशेष रिटेल स्टोअर्सवर हा सेल सुरू असून तो २८ जानेवारीपर्यंत चालेल. सेलमध्ये Sony WH-1000XM4 आणि WH-1000XM5 सह वायरलेस हेडफोन्स, एसआरएस एक्सबी-१०० आणि एसआरएस एक्सई-३०० सारखे ब्लूटूथ स्पीकर देखील सवलतीच्या दरात उपलब्ध आहेत. याशिवाय इन्स्टंट कॅशबॅक आणि नो-कॉस्ट EMI हे पर्याय देखील ग्राहकांना दिले जात आहेत.
ब्राव्हिया टीव्ही अपग्रेड करणाऱ्या खरेदीदारांना ३० टक्के सूट आणि २० हजार रुपयांपर्यंतचा झटपट कॅशबॅक मिळू शकतो. याव्यतिरिक्त, निवडक ब्राव्हिया स्मार्ट टीव्हीवर दोन वर्षांची वॉरंटी दिली जात आहे. खरेदीदार ३,९९५ रुपयांपासून सुलभ हप्त्यांमध्ये टीव्ही खरेदी करू शकतात.
सेलमध्ये सोनीचे WH-1000XM4 वायरलेस नॉइज कॅन्सलेशन हेडफोन्स १९,९९० रुपयांना उपलब्ध आहेत. ही किंमत मूळ किंमतीपेक्षा २९,९९० रुपयांनी कमी आहे. Sony WH-1000XM5 ३४,९९० रुपयांऐवजी २६,९९० रुपयांना उपलब्ध आहे. याशिवाय ग्राहकांना या मॉडेल्सवर २ हजार रुपयांचा कॅशबॅक देखील मिळू शकतो.
Sony WH-XB910N हेडफोन १९,९९० रुपयांऐवजी १०,९९० रुपयांना उपलब्ध आहे. Sony WH-CH720N हेडफोन १४,९९० रुपयांऐवजी ७,९९० रुपयांना उपलब्ध आहे आणि परवडणारे Sony WH-CH520 हेडफोन ५,९९० रुपयांच्या मूळ किमतीऐवजी ३,९९० रुपयांना उपलब्ध आहेत.
सेलमध्ये Sony WF-1000XM5 ट्रू वायरलेस इअरफोन २९,९९० रुपयांच्या मूळ किमतीऐवजी २३,९९० रुपयांना उपलब्ध आहेत. कंपनी या मॉडेलवर २ हजार रुपयांचा अतिरिक्त कॅशबॅक देखील देत आहे. Sony WF-C500 ८,९९० ऐवजी ५,९९० रुपयांना, तर Sony WF-C700N १२,९९० ऐवजी ७,९९० रुपयांना मिळत आहेत.
सोनीचे गेमिंग हेडफोन MDR-G300 ५,९९० रुपयांना खरेदी केले जाऊ शकतात, तर Sony WH-G500 वर ८ हजार रुपयांची सूट आहे. हे हेडफोन १३,९९० रुपयांना मिळत आहेत.
सेलमध्ये Sony SRS-XE300 आणि SRS-XE200 ब्लूटूथ स्पीकर अनुक्रमे १२,९९० रुपये (MRP २४,९९० रु.) आणि ९,९९० (MRP १५,९९० रु.) मध्ये मिळत आहेत. तसंच, Sony SRS-XB100 ची किंमत ३,९९० रुपये (MRP ५,९९० रु.) आहे आणि Sony MHC-V43D पार्टी स्पीकरची किंमत ३२,९९० (MRP ४६,९९० रु.) रुपये आहे. Sony SRS-XP500 ब्लूटूथची किंमत २४,९९० रुपये (MRP ३५,९९० रु) आहे.
सोनी रिपब्लिक डे सेल सध्या सोनी रिटेल स्टोअर्स, शॉपएटीएससी पोर्टल, अग्रगण्य इलेक्ट्रॉनिक स्टोअर्स आणि अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टसह इतर ई-कॉमर्स वेबसाइटवर सुरू आहे.
संबंधित बातम्या