मराठी बातम्या  /  बिझनेस  /  png ipo : सांगलीतील ‘या’ कंपनीचा आयपीओ उद्या येतोय, एका शेअरची किंमत किती? पाहा

png ipo : सांगलीतील ‘या’ कंपनीचा आयपीओ उद्या येतोय, एका शेअरची किंमत किती? पाहा

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
Dec 07, 2022 06:38 PM IST

PNGS Gargi Fashion Jewellery IPO : आयपीओमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी चांगली बातमी. ८ डिसेंबरला, उद्या आणखी एक नवा आयपीओ दाखल होत आहे. हा इश्यू १३ डिसेंबरपर्यंत खुला राहील. इश्यू प्राईज ३० रुपये प्रति शेअर्स निर्धारित करण्यात आला आहे.

IPO HT
IPO HT

PNGS Gargi Fashion Jewellery IPO : आयपीओमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी चांगली बातमी. ८ डिसेंबरला, उद्या आणखी एक नवा आयपीओ दाखल होत आहे. पीएनजीएस गार्गी फॅशन ज्वेलरी ८ डिसेंबरला एसएमई सेगमेंटमध्ये आपला आयपीओ दाखल करेल. या इश्यूमध्ये गुंतवणूकदार १३ डिसेंबरपर्यंत बोली लावू शकतात.या आयपीओची किंमत ३० रुपये प्रति शेअर्स निर्धारित करण्यात आली आहे.

२६ लाखांपर्यंत शेअर्स इश्यू

कंपनी २६ लाखांपर्यंत शेअर्स इश्यू करुन फंड्स गोळा करणार आहे.आयसीआयसीआय बॅक या शेअर्सचा स्पाॅन्सर्स्ड आहे.या आॅफरसाठी जारी करण्यात आलेल्या शेअर्सचे दर्शनी मूल्य १० रुपये प्रति शेअर्स आहे. तर बाजार लाॅट साईज ४००० रुपये आहे.

कंपनीचा व्यवसाय

पीएनजीएस गार्गी ही कंपनी न्यू जनरेशनच्या फॅशन ज्वेलरी क्षेत्रात काम करत आहे. आगामी दिवसात लाईफ स्टाईल क्षेत्रात काम करण्याची योजना आहे. ज्वेलरी क्षेत्रातील या कंपनीचा आर्थिक वर्ष २०२२ मध्ये निव्वळ नफा अंदाजे ११०.५३ कोटी रुपये होता.पी

कंपनीचे मूळ सांगलीत पण विस्तार जगभरात

पीएनजीएस गार्गी फॅशन ज्वेलरी ब्रँडची पीएनजी ज्वेलर्स (पुरुषोत्तम नारायण गाडगीळ) ही पालक कंपनी आहे. या कंपनीची स्थापना १८३२ मध्ये सांगलीत गणेश गाडगीळ यांनी केली होती. त्यानंतर त्यांच्या पुढील पिढीने या व्यवसायाचा वटवृक्ष केला आहे.

(डिस्‍क्‍लेमर: ही माहिती केवळ कंपन्यांच्या शेअर मार्केटमधील कामगिरीवर आधारीत आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. त्यामुळं वाचकांनी आपल्या वित्तीय सल्लागाराच्या सुचनेनुसारच गुंतवणुकीचा निर्णय घ्यावा.)

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग