मराठी बातम्या  /  बिझनेस  /  PNG IPO : पीएनजीएस गार्गी फॅशन ज्वेलरीचा आयपीओ दाखल, ९० टक्के प्रिमियमसह ५७ रुपयांना नोंदणी

PNG IPO : पीएनजीएस गार्गी फॅशन ज्वेलरीचा आयपीओ दाखल, ९० टक्के प्रिमियमसह ५७ रुपयांना नोंदणी

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
Dec 20, 2022 06:52 PM IST

PNG IPO : महाराष्ट्रातून एसएमईअंतर्गत फॅशन ज्वेलरी सेक्टरमधून लिस्ट होणारी पीएनजीएस गार्गी फॅशन ज्वेलरीच्या शेअरची नोंदणी मुंबई शेअर बाजारात तब्बल ९०% नी ५७ रुपयांना मंगळवारी झाली.

IPO_HT
IPO_HT

PNG IPO : महाराष्ट्रातून एसएमईअंतर्गत फॅशन ज्वेलरी सेक्टरमधून लिस्ट होणारी पीएनजीएस गार्गी फॅशन ज्वेलरीच्या शेअरची नोंदणी मुंबई शेअर बाजारात तब्बल ९०% नी ५७ रुपयांना मंगळवारी झाली. गार्गी बाय पी. एन. गाडगीळ अँड सन्स या फॅशन ज्वेलरी ब्रँड अंतर्गत कंपनी विविध प्रकारच्या फॅशन ज्वेलरीची विक्री करते.

दिवसभराच्या व्यवहारात कंपनीचा शेअर ५९.८५ रुपयांच्या उच्चांकी पातळीवर गेला होता. शेअर नोंदणीच्या वेळी अजित गाडगीळ, डॉ. रेणू गाडगीळ, अमित मोडक, बीएसईचे समीर पाटील, आदित्य मोडक, बीएसई एसएमइचे अजय ठाकूर आधी उपस्थित होते.

बीएसईच्या एसएमई प्लॅटफॉर्मअंतर्गत कंपनीला आयपीओ करण्याची मान्यता मिळाली होती. कंपनीने १० रुपये दर्शनी मूल्याच्या प्रत्येक शेअरसाठी ३० रुपये किंमत निश्चित केली होती. किमान चार हजार शेअरच्या एका लॉटसाठी अर्ज करायचा होता. आयपीओ ८ ते १३ डिसेंबरदरम्यान खुला होता. त्यास २१५ पटींपेक्षा अधिक प्रतिसाद मिळाला. कंपनी २६ लाख शेअरच्या विक्रीतून ७.८० कोटी रुपयांचे भांडवल गोळा करण्याची योजना होती. आयपीओला तब्बल १७०० कोटी रुपयांहून अधिकची बोली होती.

पीएनजीएस गार्गी फॅशन ज्वेलरी लिमिटेडच्या शेअरच्या मुंबई शेअर बाजारातील नोंदणीच्या वेळी (डावीकडून) अमित मोडक, बीएसई चे समीर पाटील, मागील बाजूस आदित्य मोडक, डॉ. रेणू गाडगीळ, अजित गाडगीळ, बीएसई एसएमइचे अजय ठाकूर.
पीएनजीएस गार्गी फॅशन ज्वेलरी लिमिटेडच्या शेअरच्या मुंबई शेअर बाजारातील नोंदणीच्या वेळी (डावीकडून) अमित मोडक, बीएसई चे समीर पाटील, मागील बाजूस आदित्य मोडक, डॉ. रेणू गाडगीळ, अजित गाडगीळ, बीएसई एसएमइचे अजय ठाकूर.

गार्गी बाय पी. एन. गाडगीळ अँड सन्सने फॅशन ज्वेलरी व्यवसायाची सुरुवात २०२१ मध्ये केली. चांदी, ब्रास व अन्य प्रकारची फॅशन ज्वेलरी, विविध प्रकारच्या शोभेच्या वस्तू, भेट वस्तूंची विक्री कंपनी ऑनलाइन (देशभरात) व ऑफलाइन (महाराष्ट्र, गुजरात व कर्नाटक) पद्धतीने करते. पीएनजीएस गार्गी फॅशन ज्वेलरीची सुरुवात भारतातील जुना अन् प्रसिद्ध ज्वेलरी ब्रँड असलेल्या पु. ना. गाडगीळ आणि सन्सचे प्रवर्तक अजित गाडगीळ व डॉ. रेणू गाडगीळ यांनी २०२१ मध्ये केली.

फॅशन ज्वेलरी हा भविष्यात लाइफस्टाइलचा एक महत्त्वाचा घटक ठरणार असून, या क्षेत्रातील व्यवसायाची क्षमता लक्षात घेऊन पु ना गाडगीळ आणि सन्सच्या पीएनजीएस गार्गी फॅशन ज्वेलरीने या क्षेत्रात पदार्पण केले आहे, असे अमित मोडक यांनी सांगितले.

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग