Smartphones Under 15000: १५ हजारांपेक्षा कमी किंमतीतील सर्वात वेगवान एआय प्रोसेसर असलेला फोन!
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Smartphones Under 15000: १५ हजारांपेक्षा कमी किंमतीतील सर्वात वेगवान एआय प्रोसेसर असलेला फोन!

Smartphones Under 15000: १५ हजारांपेक्षा कमी किंमतीतील सर्वात वेगवान एआय प्रोसेसर असलेला फोन!

Jan 28, 2025 11:21 PM IST

Fastest AI Processor Smartphones: पॉवरफुल गेमिंग प्रोसेसर असलेला ५जी स्मार्टफोन ग्राहकांना १५ हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळत आहे.

५ हजारांपेक्षा कमी किंमतीतील सर्वात वेगवान एआय प्रोसेसर असलेला फोन!
५ हजारांपेक्षा कमी किंमतीतील सर्वात वेगवान एआय प्रोसेसर असलेला फोन!

Realme NARZO 70 Turbo 5G: जर तुम्हाला बजेट किंमतीत दमदार फीचर्स असलेला 5G स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर रियलमी नार्झो ७० टर्बोवर जोरदार सूट मिळत आहे.  हा फोन सेगमेंटमधील सर्वात वेगवान एआय प्रोसेसरसह आणला असून यात सर्वात मोठा स्टेनलेस स्टील व्हेपर कूलिंग चेंबर असल्याचा दावा कंपनीने केला आहे. या डिव्हाइसमध्ये मजबूत फीचर्स आणि प्रीमियम फिनिश बिल्ड-क्वालिटी आहे.

नार्झो ७० टर्बो ला गेमिंग किलर डिव्हाइस म्हणून सादर करण्यात आले होते आणि यात 6६०५० स्क्वेअर मीटरचे कूलिंग चेंबर आहे, जेणेकरून दीर्घ गेमिंग सेशनदरम्यान फोन गरम होणार नाही. फोनमध्ये मीडियाटेक डायमेंसिटी ७३०० एनर्जी 5G प्रोसेसर देण्यात आला आहे, जो स्मूथ गेमिंग परफॉर्मन्स आणि मल्टी-टास्किंग परफॉर्मन्स प्रदान करतो.

 

६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज असलेल्या रियलमी स्मार्टफोनच्या बेस व्हेरियंटला ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म अॅमेझॉनवर १६,९९८ रुपयांमध्ये लिस्ट करण्यात आले आहे. या फोनवर २००० रुपयांचा कूपन डिस्काउंट मिळत आहे, ज्यामुळे याची किंमत १४,९९८ रुपये असेल. या फोनवर कॅशबॅक आणि नो-कॉस्ट ईएमआय सारख्या ऑफर्स देखील उपलब्ध आहेत.

जुने फोन एक्सचेंज करताना रिअलमी डिव्हाइस खरेदी केल्यास ग्राहकांना जास्तीत जास्त १५,८५० रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. त्याची किंमत जुन्या फोनच्या मॉडेलवर आणि त्याच्या स्थितीवर अवलंबून असते. हे डिव्हाइस ग्रे, ग्रीन आणि यलो कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे.

रियलमी स्मार्टफोनमध्ये १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि २००० एनआयटी पीक ब्राइटनेससह ६.६७ इंचाचा ओएलईडी डिस्प्ले आहे. यात मीडियाटेक डायमेंसिटी 7300 एनर्जी 5जी प्रोसेसर देण्यात आला असून बॅक पॅनेलवर 50 मेगापिक्सलचा कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनमध्ये ४५ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५००० एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

Whats_app_banner