Budget Smartphones: कमी किंमतीत दमदार फीचर्स असलेल्या स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असलेल्या ग्राहकांसाठी अॅमेझॉनवर मोठी डील आहे. अॅमेझॉनवर ८ जीबी पर्यंत रॅम आणि सुंदर लूक असलेला आयटेल झेनो १० हा फोन सध्या ५ हजारांपेक्षा कमी किंमतीत उपलब्ध आहे.
फोनच्या ३ जीबी रॅम व्हेरिएंटची किंमत ५ हजार ७९९ रुपये असून अॅमेझॉनवर लिस्ट करण्यात आली आहे. बँकेच्या ऑफरनंतर हा फोन ४ हजार ९१९ रुपयांच्या प्रभावी किंमतीत खरेदी करता येणार आहे. व्हर्च्युअल रॅमच्या मदतीने फोनची रॅम ८ जीबीपर्यंत वाढवता येऊ शकते. त्याचप्रमाणे ४ जीबी रॅम व्हेरियंटची किंमत ६ हजार १९९ रुपये आहे, जी बँक ऑफरनंतर ५ हजार ०७९ रुपयांच्या प्रभावी किंमतीत खरेदी केली जाऊ शकते. व्हर्च्युअल रॅमच्या मदतीने फोनचा रॅम १२ जीबीपर्यंत वाढवता येऊ शकते. हा फोन फँटम क्रिस्टल आणि ओपल पर्पल या दोन रंगांमध्ये खरेदी करता येणार आहे.
फोन ड्युअल सिम सपोर्टसह येतो आणि अँड्रॉइड १४ वर चालतो. यात ६० हर्ट्झ रिफ्रेश रेटसह ६.६ इंचाचा एचडी प्लस आयपीएस डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनमध्ये आयफोनसारखे डायनॅमिक बार फीचर देण्यात आले आहे, जे सेल्फी कॅमेरा कटआऊटभोवती बॅटरी चार्जिंग डिटेल्स आणि इनकमिंग कॉल अलर्ट सारखे नोटिफिकेशन दर्शवते.
आयटेल झेनो १० मध्ये ३ जीबी आणि ४ जीबी रॅम चा पर्याय देण्यात आला आहे. हा फोन ऑक्टा-कोर चिपसेटवर चालतो. ३ जीबी रॅम व्हेरियंट ५ जीबी व्हर्च्युअल रॅम सपोर्ट करतो तर ४ जीबी रॅम व्हेरिएंट ८ जीबी व्हर्च्युअल रॅम सपोर्ट करतो. दोन्ही व्हेरियंटमध्ये ६४ जीबी ऑनबोर्ड स्टोरेज देण्यात आले आहे.
फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा मेन सेन्सरसह एआय सपोर्टेड ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फ्रंटमध्ये सेल्फी आणि व्हिडिओ चॅटसाठी ५ मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.
ऑथेंटिकेशनसाठी फोनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला असून तो फेस अनलॉक फीचरला सपोर्ट करतो. फोनमध्ये वाय-फाय, ब्लूटूथ आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट चा समावेश आहे. फोनमध्ये ५००० एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. १८६ ग्रॅम वजनाच्या या फोनचे डायमेंशन १६४×७६x९ मिमी आहे.
संबंधित बातम्या