रील बनवण्यासाठी चांगला फोन शोधताय? 'हे' आहेत ३ बेस्ट ऑप्शन, किंमत २० हजार रुपयांपेक्षा कमी
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  रील बनवण्यासाठी चांगला फोन शोधताय? 'हे' आहेत ३ बेस्ट ऑप्शन, किंमत २० हजार रुपयांपेक्षा कमी

रील बनवण्यासाठी चांगला फोन शोधताय? 'हे' आहेत ३ बेस्ट ऑप्शन, किंमत २० हजार रुपयांपेक्षा कमी

Dec 14, 2024 11:39 PM IST

Smartphones Under 20000: सेल्फी किंवा रीलबनवण्यासाठी चांगला फोन खरेदी करण्याचा विचार करताय? मग ही बातमी तुमच्यासाठीच आहे.

रील बनवण्यासाठी चांगला फोन शोधताय? 'हे' आहेत ३ बेस्ट ऑप्शन
रील बनवण्यासाठी चांगला फोन शोधताय? 'हे' आहेत ३ बेस्ट ऑप्शन

सेल्फी किंवा रील्स बनवण्यासाठी बजेट स्मार्टफोनच्या शोधात असलेल्या ग्राहकांसाठी चांगली बातमी आहे. अ‍ॅमेझॉनवर सुरू असलेल्या सेलमध्ये २० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत तीन बेस्ट सेल्फी कॅमेरा फोन मिळत आहेत. या फोनमध्ये तुम्हाला ५० मेगापिक्सलपर्यंतचा फ्रंट कॅमेरा मिळेल. विशेष म्हणजे या फोनमध्ये १०८ मेगापिक्सलपर्यंतचा रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या यादीत सॅमसंग आणि ओप्पोच्या हँडसेटचाही समावेश आहे.

सॅमसंग गॅलेक्सी एफ ५५ 5G (८ जीबी/ १२८ जीबी)

अ‍ॅमेझॉन इंडियावर या सॅमसंग फोनची किंमत १९ हजार ३९० रुपये आहे. सॅमसंगचा हा फोन ५० मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेराने सुसज्ज आहे. याच्या रियरमध्ये आपल्याला एलईडी फ्लॅशसह तीन कॅमेरे मिळतील. यामध्ये ५० मेगापिक्सलच्या मेन लेन्ससह ८ मेगापिक्सल आणि २ मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये देण्यात आलेला फुल एचडी+ डिस्प्ले ६.७ इंचाचा आहे. हा सॅमोलेड डिस्प्ले १२० हर्ट्झच्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. प्रोसेसर म्हणून या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन ७ जेन २ चिपसेट मिळेल. फोनमध्ये ४५ वॅट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५००० एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.

ओप्पो एफ २५ प्रो 5G (८ जीबी/१२८ जीबी)

ओप्पोचा हा फोन अ‍ॅमेझॉनवर १८ हजार ४०८ रुपयांच्या किंमतीसह लिस्ट झाला आहे. फोनमध्ये कंपनी ३२ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देत आहे. याच्या बॅक पॅनेलवर आपल्याला एलईडी फ्लॅशसह ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळेल. यात ६४ मेगापिक्सलचा मेन लेन्ससह ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स आणि २ मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये १२० हर्ट्झरिफ्रेश रेटसह ६.७ इंचाचा अमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनमध्ये डायमेंसिटी ७०५० प्रोसेसर देण्यात आला आहे.

इनफिनिक्स नोट ४० 5G (८ जीबी/ २५६ जीबी)

अ‍ॅमेझॉन इंडियावर या फोनची किंमत १६ हजार ५०० रुपये आहे. रिल्स आणि सेल्फी शूट करण्यासाठी या फोनमध्ये तुम्हाला ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळेल. यात मागील बाजूस १०८ मेगापिक्सलचा सुपर झूम कॅमेरा देण्यात आला आहे. याशिवाय रियरमध्ये तुम्हाला २ मेगापिक्सलचे दोन कॅमेरे ही दिसतील. या फोनमध्ये १२० हर्ट्झ रिफ्रेश रेटसह अमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेचा आकार ६.७८ इंच आहे. प्रोसेसर म्हणून कंपनी या फोनमध्ये डायमेंसिटी ७०२० चिपसेट ऑफर करत आहे. बायोमेट्रिक सुरक्षेसाठी फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे.

Whats_app_banner