OnePlus Smartphones Under 20000: चीनची टेक कंपनी वनप्लसने आपल्या नॉर्ड लाइनअपमध्ये नवीन स्मार्टफोन वनप्लस नॉर्ड सीई ४ लाइट 5G जोडला आहे. कंपनीने हे डिव्हाइस वनप्लस नॉर्ड सीई ३ लाइट 5G चे उत्तराधिकारी म्हणून आणले आहे आणि यात दमदार स्पेसिफिकेशन्स आहेत. मोठा अमोलेड डिस्प्ले, ८० वॉट फास्ट चार्जिंग आणि ५० मेगापिक्सेल कॅमेरा सेटअप असलेल्या डिव्हाइसेसवर ग्राहकांना विशेष बँक डिस्काऊंटचा ही लाभ मिळत आहे.
कंपनीने २४ जून रोजी संध्याकाळी ७ वाजता व्हर्च्युअल इव्हेंटमध्ये नवीन बजेट फोन सादर केला. नवीन वनप्लस नॉर्ड सीई ४ लाइट 5G ओप्पो के १२ एक्सचे रिब्रँडेड व्हर्जन असेल. ग्राहक नवीन फोन कंपनीच्या वेबसाइटव्यतिरिक्त ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म अॅमेझॉनवरून खरेदी करू शकतील.
वनप्लसने आपला नवा फोन दोन रॅम आणि स्टोरेज व्हेरियंटमध्ये सादर केला आहे. ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेजच्या पहिल्या व्हेरियंटची किंमत २० हजार ९९९ रुपये आहे. तर, ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज असलेला व्हेरियंट २३ हजार ९९९ रुपयांमध्ये सादर करण्यात आला आहे. स्पेशल लॉन्च ऑफर्समुळे त्यावर १००० रुपयांची सूट दिली जात आहे. हे डिव्हाइस खरेदी केल्यास निवडक बँक कार्डद्वारे पेमेंट केल्यास १००० रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट दिला जाऊ शकतो.
नव्या फोनसोबत जिओ पोस्टपेड प्लॅनमध्ये वनप्लस स्टुडंट प्रोग्रामसोबत २ हजार २५० रुपयांचे फायदे आणि २५० रुपयांची अतिरिक्त सूट मिळणार आहे. याशिवाय, ग्राहक एक्स्चेंज ऑफरही मिळत आहे. परंतु, एक्सचेंजमध्ये मिळणारी सूट आपल्या जुन्या फोन, ब्रँड आणि कंपनीच्या एक्सचेंज पॉलिसीच्या स्थितीवर अवलंबून असेल. हा सेल १९ जूनपर्यंत चालणार आहे. हा फोन मेगा ब्लू, सुपर सिल्व्हर आणि अल्ट्रा ऑरेंज मध्ये खरेदी करता येणार असून त्याची विक्री २७ जून रोजी दुपारी १२ वाजता सुरू होणार आहे.
वनप्लस स्मार्टफोनमध्ये १२० हर्ट्झ रिफ्रेश रेटसह ६.६७ इंचाचा फुल एचडी+ अमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ६९५ प्रोसेसर आणि अँड्रॉइड १४-आधारित ऑक्सिजनओएस १४ सॉफ्टवेअर स्किन देण्यात आले आहे. फोनच्या बॅक पॅनेलमध्ये ५० एमपी सोनी एलवायटी-६०० प्रायमरी सेन्सर आणि २ एमपी डेप्थ सेन्सरसह ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. वनप्लस स्मार्टफोनमध्ये सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. या डिव्हाइसच्या ५५०० एमएएच क्षमतेच्या बॅटरीला ८० वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळतो. यात ५ वॅट रिव्हर्स चार्जिंग सपोर्ट देखील देण्यात आला आहे. व्हर्च्युअल रॅम फीचरमुळे या फोनची रॅम क्षमता १६ जीबीपर्यंत वाढते.
संबंधित बातम्या