Top 5 Camera Phones Under 15000: उत्कृष्ट कॅमेरा असलेल्या स्मार्टफोन खरेदी करण्यास इच्छुक असलेल्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण, ग्राहकांना अवघ्या १५ हजारांत १०८ मेगापिक्सल कॅमेरा असलेला स्मार्टफोन खरेदी करण्याची सुवर्णसंधी आहे. आज आपण १०८ मेगापिक्सल कॅमेरा असलेल्या टॉप ५ स्मार्टफोनची यादी पाहुयात. या यादीत पोकोपासून ते रियलमी आणि मोटोरोलापर्यंतच्या फोनचा समावेश आहे, जे सध्या बाजारात धुमाकूळ घालत आहेत.
पोको 5G स्मार्टफोनमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप असून १०८ मेगापिक्सल मुख्य कॅमेरा आणि २ मेगापिक्सल सेकंडरी कॅमेरा आणि फ्रंटला १६ एमपी सेल्फी कॅमेरा आहे. या फोनमध्ये ५ हजार एमएएच क्षमता असलेली बॅटरी देण्यात आली, जे ३३ वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. अॅमेझॉनवर या फोनची सुरुवातीची किंमत १४ हजार ४८० रुपये दाखवण्यात येत आहे.
मोटोरोला स्मार्टफोनमध्ये 32 एमपी सेल्फी कॅमेरा आहे आणि त्याच्या बॅक पॅनेलवर १०८ एमपी + ८ एमपी + २ एमपी ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ७३२ जी प्रोसेसरसह दमदार परफॉर्मन्स देतो आणि फ्लिपकार्टवर १४ हजार ९९९ रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत उपलब्ध आहे.
इनफिनिक्स नोट ३० 5G मध्ये शक्तिशाली मीडियाटेक डायमेंसिटी ६०८० प्रोसेसर, बॅक पॅनेलवर १०८ मेगापिक्सल मुख्य आणि २ मेगापिक्सलचा सेकंडरी सेन्सरसह ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये १६ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळत आहे. हा फोन फ्लिपकार्टवरून १४ हजार ९९९ रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत ऑर्डर केला जाऊ शकतो.
आयटेल स्मार्टफोनमध्ये १०८ एमपी ड्युअल एआय कॅमेरा सेटअप आणि ८ एमपी सेल्फी कॅमेरा आहे. या फोनमध्ये मीडियाटेक हेलियो जी९१ प्रोसेसर असून ९० हर्ट्झ रिफ्रेश रेट असलेला पंच-होल डिस्प्ले या डिव्हाइसचा भाग आहे. फ्लिपकार्टवर हा स्मार्टफोन ९ हजार ९६५ रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत उपलब्ध आहे.
रियलमी सी-सीरिज स्मार्टफोनमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप असून बॅक पॅनेलवर १०८ एमपी मेन आणि २ एमपी सेकंडरी सेन्सर आहे. यात ८ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा ही देण्यात आला आहे. अॅमेझॉनवर ग्राहकांना हा फोन ८ हजार ८४४ रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत खरेदी करता येणार आहे. या फोनमध्ये १८ वॅट फास्ट चार्जिंगव्यतिरिक्त टायगर टी ६१२ प्रोसेसर देण्यात आला आहे.