Smartphones Under 11000: अवघ्या १० हजार ४९९ रुपयांत खरेदी करा सॅमसंगचा ‘हा’ जबरदस्त 5G फोन!
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Smartphones Under 11000: अवघ्या १० हजार ४९९ रुपयांत खरेदी करा सॅमसंगचा ‘हा’ जबरदस्त 5G फोन!

Smartphones Under 11000: अवघ्या १० हजार ४९९ रुपयांत खरेदी करा सॅमसंगचा ‘हा’ जबरदस्त 5G फोन!

Nov 18, 2024 07:40 PM IST

Flipkart Sale: फ्लिपकार्ट सेलमध्ये सॅमसंग गॅलेक्सी ए१४ 5G मोठ्या सवलतीसह उपलब्ध आहे. हा लॉन्चिंग किंमतीपेक्षा ७ हजारांनी स्वस्त मिळत आहे.

अवघ्या १० हजार ४९९ रुपयांत खरेदी करा सॅमसंगचा ‘हा’ जबरदस्त 5G फोन!
अवघ्या १० हजार ४९९ रुपयांत खरेदी करा सॅमसंगचा ‘हा’ जबरदस्त 5G फोन!

Samsung Galaxy A14 5G at Massive Discount: . अवघ्या ११ हजारांत चांगला 5G स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असलेल्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. फ्लिपकार्टवर सुरु असलेल्या सेलमध्ये सॅमसंगचा दमदार स्मार्टफोन सॅमसंग गॅलेक्सी ए१४ 5G स्वस्तात उपलब्ध झाला आहे. या फोनमध्ये ग्राहकांना ५० एमपी मुख्य कॅमेरा आणि ५००० एमएएच बॅटरी मिळत आहे. २०२३ च्या काउंटरपॉईंटच्या रिपोर्टनुसार, आतापर्यंत २० दशलक्ष लोकांनी हा फोन खरेदी केला आहे.

सॅमसंग गॅलेक्सी ए १४ 5G फोनचा ४ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरियंट १७ हजार ४९९ रुपयांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. पण हा फोन सध्या फ्लिपकार्टच्या महाबचत सेलमध्ये ७००० रुपयांच्या थेट डिस्काउंटनंतर १० हजार ४९९ रुपयांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. तसेच हा फोन फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँकेतून फोन खरेदी केल्यास ५ टक्के कॅशबॅक देखील मिळेल. जुना फोन एक्स्चेंज केल्यास ८००० रुपयांपर्यंत एक्स्चेंज डिस्काउंटही मिळणार आहे. हा फोन डार्क रेड, लाइट ग्रीन आणि ब्लॅक या तीन रंगांमध्ये उपलब्ध आहे.

सॅमसंग गॅलेक्सी ए 14 5G: डिस्प्ले

फोनचा डिस्प्ले खूप चांगला आहे, ज्यामध्ये तुमच्याकडे ६.६ इंचाचा फुल एचडी+ एलसीडी पॅनेल आहे.

सॅमसंग गॅलेक्सी ए 14 5G: स्टोरेज

या फोनमधील स्टोरेज १ टीबीपर्यंत वाढवण्यात येऊ शकतो, जेणेकरून आपण आपल्या सर्व महत्वाच्या फाइल्स आणि मीडिया आरामात सेव्ह करू शकता. डिव्हाइसमध्ये एक्सीनॉस १३३० प्रोसेसर आहे.

सॅमसंग गॅलेक्सी ए 14 5G: कॅमेरा

फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात ५० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, २ मेगापिक्सलचा मॅक्रो आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ कॅमेरा देण्यात आला आहे. तर सेल्फीसाठी या फोनमध्ये १३ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जात आहे.

सॅमसंग गॅलेक्सी ए 14 5G: बॅटरी

फोनला पॉवर देण्यासाठी यात ५००० एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे, जी १५ वॅट फास्ट चार्जिंग आहे.

सॅमसंग गॅलेक्सी ए ५३ 5G: किंमत

३० हजारांपेक्षा कमी किंमतीचे बजेट असलेल्या ग्राहकांसाठी सॅमसंग गॅलेक्सी ए ५३ 5G चांगला पर्याय ठरू शकतो. या फोनमध्ये ग्राहकांना ६.६ इंचाचा एलसीडी डिस्प्ले मिळतो. ऑक्टा-कोर प्रोसेसर आणि स्मूथ परफॉर्मन्ससाठी ८ जीबी रॅम देण्यात आला आहे. या फोनमध्ये १२.२ एमपी + १२ एमपी + १२ एमपी रिअर कॅमेरा मिळत आहे.

Whats_app_banner