Oppo A38 Price and Specifications: १० हजारांपेक्षा कमी किंमतीत नवी फोन खरेदी करण्याचा विचारात असलेल्या ग्राहकांसाठी मोठी संधी आहे. फ्लिपकार्टचा जून बोनांझा सेल सुरू झाला असून या सेलमध्ये ग्राहकांना अनेक इलेक्ट्रिक वस्तू स्वस्तात मिळत आहेत. या सेलमध्ये ८ जीबी रॅम (एक्सटेंडेड रॅमसह) असलेला दमदार फोन ओप्पो ए ३८ मोठ्या सवलतीसह उपलब्ध आहे. या सेलअंतर्गत ग्राहक हा फोन अवघ्या ९ हजार ९९९ रुपयांत खरेदी करू शकतात. या सवलतीसाठी तुम्हाला एचडीएफसी बँकेच्या कार्डने पैसे द्यावे लागतील.
अॅक्सिस बँकेचे कार्ड असलेल्या ग्राहकांना या फोनच्या खरेदीवर ५ टक्के कॅशबॅक मिळेल. ईएमआयवरही हा फोन मिळू शकतो. हा फोन तुम्ही ७,२०० रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनससह खरेदी करू शकता. लक्षात ठेवा की, एक्सचेंजमध्ये मिळणारी सूट आपल्या जुन्या फोन, ब्रँड आणि कंपनीच्या एक्सचेंज पॉलिसीच्या स्थितीवर अवलंबून असेल. हा सेल १९ जूनपर्यंत चालणार आहे.
ओप्पोच्या या फोनमध्ये तुम्हाला ७२०×१६१२ पिक्सल रिझोल्यूशनअसलेला ६.५६ इंचाचा एचडी+ डिस्प्ले मिळेल. फोनमध्ये देण्यात आलेला हा डिस्प्ले ९० हर्ट्झच्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो, याची पीक ब्राइटनेस लेव्हल ७२० निट्स आहे. वॉटरड्रॉप नॉच डिझाइन असलेल्या या डिस्प्लेचा स्क्रीन टू बॉडी रेशो ८९.९० टक्के आहे. कंपनीचा हा फोन ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी इंटरनल स्टोरेजने सुसज्ज आहे. यात एक्सटेंडेड रॅम फीचरही देण्यात आले आहे. यामुळे फोनची एकूण रॅम ८ जीबीपर्यंत वाढते.
प्रोसेसर म्हणून फोनमध्ये तुम्हाला मीडियाटेक हेलियो जी ८५ चिपसेट पाहायला मिळेल. फोटोग्राफीसाठी फोनच्या रियरमध्ये एलईडी फ्लॅशसह ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात ५० मेगापिक्सलप्रायमरी लेन्ससह २ मेगापिक्सलचा पोर्ट्रेट लेन्स देण्यात आला आहे. सेल्फीसाठी तुम्हाला ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळेल. फोनमध्ये फ्रंट आणि रिअर कॅमेरे देण्यात आल्याने तुम्ही ३० एफपीएसवर १०८० पी व्हिडिओ शूट करू शकता.
फोनची बॅटरी ५००० एमएएच ची आहे. ही बॅटरी ३३ वॅट सुपरवूक चार्जिंगला सपोर्ट करते. साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर असलेल्या ओप्पोच्या या फोनमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी ड्युअल सिम, 4G व्हीओएलटीई, वाय-फाय, जीपीएस, यूएसबी टाइप-सी पोर्ट आणि ३.५ एमएम हेडफोन जॅक सारखे पर्याय आहेत. हा फोन ग्लोइंग ब्लॅक आणि ग्लोइंग गोल्ड या दोन कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे.
संबंधित बातम्या