Smartphones Under 10000: अवघ्या १० हजारांत खरेदी करा हे '५' बेस्ट 5G फोन, मिळतायेत दमदार फीचर्स!
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Smartphones Under 10000: अवघ्या १० हजारांत खरेदी करा हे '५' बेस्ट 5G फोन, मिळतायेत दमदार फीचर्स!

Smartphones Under 10000: अवघ्या १० हजारांत खरेदी करा हे '५' बेस्ट 5G फोन, मिळतायेत दमदार फीचर्स!

Nov 05, 2024 07:10 PM IST

Best Smartphones Under 10000: दहा हजारांपेक्षी कमी किंमतीत दमदार फीचर्स असलेला स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे.

१० हजारांपेक्षा कमी किंमतीतील फोन
१० हजारांपेक्षा कमी किंमतीतील फोन

Best Smartphones :  जर तुमचा फोन अचानक खराब झाला असेल आणि आता तुम्हाला अगदी स्वस्तात फोन खरेदी करायचा असेल तर, ही बातमी तुमच्या आनंदात भर घालू शकते. बाजारात असे काही स्मार्टफोन उपलब्ध आहेत, ज्यात दमदार फीचर्स मिळत असून त्यांची किंमत १० हजारांपेक्षा कमी आहे. यात सॅमसंग, पोको, मोटोरोला यांसारख्या कंपनीच्या स्मार्टफोनचा समावेश आहे

1. मोटोरोला जी४५ ५जी

हा एक उत्तम फोन आहे. यामध्ये तुम्हाला १२८ जीबी इनबिल्ट स्टोरेज मिळते. मोटोरोलाचा हा फोन 10 हजारांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करणे हा एक चांगला निर्णय ठरू शकतो. फ्लिपकार्टवर हा स्मार्टफोन ९,९९९ रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत विक्रीसाठी उपलब्ध आहे. यात 6.5 इंचाची स्क्रीन असून १२० हर्ट्झचा रिफ्रेश रेट सपोर्ट करतो. यात ५० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, १६ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आणि ५००० एमएएचक्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.

2. पोको एम 6 प्रो 5G

पोको एम ६ प्रो 5G स्मार्टफोनचे ४ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज मॉडेल सध्या अ‍ॅमेझॉनवर १० हजार ९९९ रुपयांमध्ये लिस्ट झाले आहे. बँकेच्या सवलतीचा फायदा घेऊन तुम्ही ते अधिक स्वस्तात खरेदी करू शकता. फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर फोनमध्ये एफएचडी+ डिस्प्ले आहे. हा फोन स्नॅपड्रॅगन ४ जेन २ प्रोसेसरने सुसज्ज आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ५० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. फोनची बॅटरी ५००० एमएएच ची आहे.

3. नोकिया जी ४२

नोकिया जी ४२ ५जी स्मार्टफोनचे ४ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज मॉडेल फ्लिपकार्टवर १० हजार ९९९ रुपयांना खरेदी करता येईल. फोनमध्ये एचडी+ डिस्प्ले आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ५० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. कंपनीचा दावा आहे की, हा फोन एकदा चार्ज केल्यावर ३ दिवस चालतो. हा फोन स्नॅपड्रॅगन ४८० प्लस 5G प्रोसेसरसह सुसज्ज आहे.

4. सॅमसंग गॅलेक्सी ए14 5G

सॅमसंगचा हा ४ जीबी + ६४ जीबी स्टोरेज फोन फ्लिपकार्ट आणि सॅमसंगच्या साइटवर ९९९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे. सॅमसंग गॅलेक्सी ए १४ ५जी देखील खरेदी करू शकता. या फोनमध्ये ९० हर्ट्झ रिफ्रेश रेट सपोर्ट करणारा ६.६ इंचाचा पीएलएस एलसीडी डिस्प्ले आहे. परफॉर्मन्ससाठी मीडियाटेक डायमेंसिटी ७०० प्रोसेसर, ५० मेगापिक्सलचा मेन कॅमेरा, १३ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आणि ५००० एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.

5. रेडमी १२

रेडमी १२ मध्ये ६ जीबी रेडमी रॅम देण्यात आला असून ती १ टीबीपर्यंत वाढवता येऊ शकते. अॅमेझॉनवर या शानदार स्मार्टफोनची किंमत 9,999 रुपये आहे. फोनमध्ये ६.७९ इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. तर हा फोन ५० एमपी + ८ एमपी + २ एमपी मेन कॅमेरा आणि ८ एमपी फ्रंट कॅमेरा सारख्या वैशिष्ट्यांनी सुसज्ज आहे. या फोनमध्ये ५००० एमएएच ची बॅटरी देखील देण्यात आली आहे. यात हेलियो जी ८८ प्रोसेसर आहे.

Whats_app_banner