Samsung Galaxy A14 5G Under 10000: जर तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करत असाल तर 5जी कनेक्टिव्हिटी असलेला फोन खरेदी करणे शहाणपणाचे ठरेल. जिओ आणि एअरटेलकडून अनलिमिटेड 5G डेटाचा फायदा अशा ग्राहकांना दिला जात आहे, ज्यांच्याकडे 5G स्मार्टफोन आहे. अशा परिस्थितीत तुम्हीही 5G स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत आहात, पण तुमचे बजेट कमी आहे? मग ही बातमी तुमच्यासाठीच आहे. बेस्ट सेलिंग बजेट 5G स्मार्टफोन सॅमसंग गॅलेक्सी ए १४ 5G ग्राहकांना १० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळत आहे.
ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर सॅमसंग गॅलेक्सी ए१४ 5G सवलतीच्या दरात लिस्ट करण्यात आला आहे. फोनमध्ये ५० मेगापिक्सल ट्रिपल कॅमेरा सेटअप, मोठा डिस्प्ले आणि ५००० एमएएच बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन फुल चार्ज केल्यावर दोन दिवसांचा बॅकअप मिळू शकतो, असा ब्रँडचा दावा आहे. काउंटरपॉइंटने आपल्या रिसर्च अहवालात म्हटले होते की, २०२३ च्या जानेवारी ते जुलै २०२४ दरम्यान हा सर्वात जास्त विकला गेलेला 5G फोन आहे.
६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज असलेला सॅमसंग डिव्हाइस फ्लिपकार्टवर १० हजार ९९९ रुपयांना लिस्ट झाला आहे. परंतु, जर ग्राहकाने फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक क्रेडिट कार्डच्या मदतीने पेमेंट केले तर ५ टक्के कॅशबॅक मिळेल. विशेष म्हणजे, या फोनवर एक्स्चेंज डिस्काउंटही दिला जात आहे. ग्राहकांना जास्तीत जास्त ७ हजार ५०० रुपयांपर्यंत एक्स्चेंज डिस्काउंट मिळू शकतो. एक्स्चेंज डिस्काऊंटची किंमत जुन्या फोन मॉडेल आणि त्याच्या स्थितीवर अवलंबून असते. हे डिव्हाइस ब्लॅक, डार्क रेड आणि लाइट ग्रीन कलर ऑप्शनमध्ये खरेदी करता येईल.
सॅमसंग स्मार्टफोनमध्ये ६.६ इंचाचा एलसीडी डिस्प्ले आहे, जो ९० हर्ट्झ रिफ्रेश रेट सपोर्ट देतो. फोनमध्ये एक्सीनॉस १३३० प्रोसेसर असून १३ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. बॅक पॅनेलवरील प्रायमरी सेटअपमध्ये ५० एमपी मुख्य सेन्सरसह २ एमपी मॅक्रो आणि २ एमपी डेप्थ सेन्सर आहे. या फोनच्या ५ हजार एमएएच देण्यात आली आहे, जी १५ वॅट फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. ऑथेंटिकेशनसाठी यात साइड माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे.
संबंधित बातम्या