Smartphones Offers: जर तुम्ही सॅमसंगचा फोन घेण्याचा विचार करत असाल तर कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर तुमच्यासाठी एक चांगली डील आहे. सॅमसंग गॅलेक्सी ए३५ 5G वर ही बंपर डील दिली जात आहे. फोनच्या ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटरनल स्टोरेज व्हेरियंटची किंमत ३० हजार ९९९ रुपये आहे. एचडीएफसी किंवा आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास तुम्हाला ५ हजार रुपयांची सूट मिळणार आहे.
कंपनी या फोनमध्ये १२० हर्ट्झच्या रिफ्रेश रेटसह ६.६ इंचाचा फुल एचडी+ सुपर एमोलेड डिस्प्ले देत आहे. डिस्प्ले प्रोटेक्शनसाठी कंपनी या फोनमध्ये गोरिल्ला ग्लास व्हिक्टस देखील देत आहे.
या फोनमध्ये तुम्हाला ८ जीबी रॅम आणि २५६ जीबीपर्यंत इंटरनल स्टोरेजचा पर्याय मिळेल. प्रोसेसर म्हणून कंपनी यात एक्सीनॉस १३८० चिपसेट देत आहे.
फोनमध्ये फोटोग्राफीसाठी तुम्हाला एलईडी फ्लॅशसह ट्रिपल कॅमेरा सेटअप पाहायला मिळेल. यात 50 मेगापिक्सलचा मेन लेन्ससह 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स आणि 5 मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर देण्यात आला आहे. फोनमधील प्रायमरी कॅमेरा ओआयएस म्हणजेच ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन फीचरने सुसज्ज आहे. सेल्फीसाठी फोनच्या फ्रंटमध्ये १३ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळेल.
बॅटरीबद्दल बोलायचे झाले तर कंपनी फोनमध्ये ५००० एमएएचची बॅटरी देत आहे. ही बॅटरी २५ वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. ओएसबद्दल बोलायचे झाले तर फोन वनयूआय ६.१ वर आधारित अँड्रॉइड १४ वर काम करतो. अधिक माहितीसाठी सॅमसंगच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.
सॅमसंगचा ए-सीरिजचा पॉवरफुल स्मार्टफोन गॅलेक्सी ए५५ 5G ग्राहकांना जवळपास ८००० रुपयांच्या सवलतीत खरेदी करण्याची संधी मिळत आहे. हा स्मार्टफोन ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर मोठ्या फ्लॅट डिस्काउंटसह लिस्ट करण्यात आला आहे.