Realme 12 Pro Plus: २४ जीबी रॅम आणि सुपर फास्ट चार्जिंग, रियलमी १२ प्रो प्लस ७५०० रुपयांनी स्वस्त!
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Realme 12 Pro Plus: २४ जीबी रॅम आणि सुपर फास्ट चार्जिंग, रियलमी १२ प्रो प्लस ७५०० रुपयांनी स्वस्त!

Realme 12 Pro Plus: २४ जीबी रॅम आणि सुपर फास्ट चार्जिंग, रियलमी १२ प्रो प्लस ७५०० रुपयांनी स्वस्त!

Nov 19, 2024 11:06 PM IST

Realme 12 Pro Plus: अ‍ॅमेझॉनवर जबरदस्त फीचर्स असलेला रियलमी १२ प्रो प्लस लॉन्चिंग किंमतीपेक्षा स्वस्त मिळत आहे.

रियलमी १२ प्रो प्लस ७५०० रुपयांनी स्वस्त!
रियलमी १२ प्रो प्लस ७५०० रुपयांनी स्वस्त!

Realme 12 Pro+ at Massive Discount:  उत्तम कॅमेरा क्वालिटी असलेला फोन खरेदी करायचा असेल तर रियलमी १२ प्रो प्लस हा एक चांगला पर्याय आहे. २५ हजार रुपयांच्या सेगमेंटमधील या फोनला चांगलीच पसंती मिळाली आहे. या फोनला रियलमीने टॉप-रेटेड कॅमेरा स्मार्टफोनचे टायटलही दिले आहे. अ‍ॅमेझॉनच्या लिमिटेड टाइम डीलमध्ये हा फोन ७५०० रुपयांपर्यंत स्वस्त मिळत आहे. 

रियलमी १२ प्रो+ 5G वर ७५०० रुपयांची सूट

रियलमी १२ प्रो प्लसचा १२ जीबी + २५६ जीबी व्हेरियंट ३३ हजार ९९९ रुपयांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. पण सध्या अ‍ॅमेझॉनच्या सेलमध्ये हा फोन ७ हजार ५०० रुपयांनी स्वस्त होत आहे. डिस्काउंटनंतर हा फोन २६ हजार ४४९ रुपयांना विकला जात आहे. अ‍ॅमेझॉन वनकार्ड क्रेडिट कार्डद्वारे हा फोन ५०० रुपयांच्या इन्स्टंट डिस्काउंटवर खरेदी करता येणार आहे. यासोबत जुने फोन एक्सचेंज केल्यास २३ हजारापर्यंत सूट मिळू शकते.  या ऑफरसंदर्भात अधिक माहितीसाठी अ‍ॅमेझॉनच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.

रियलमी १२ प्रो प्लस 5G: डिस्प्ले

फोनमध्ये १०८०x२४०० पिक्सल रिझोल्यूशनअसलेला ६.७ इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले मिळेल. हा ओएलईडी डिस्प्ले १२० हर्ट्झच्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो.

रियलमी १२ प्रो प्लस 5G: स्टोरेज

फोनमध्ये 12 जीबी पर्यंत रॅम आणि 256 जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज मिळते. फोनमध्ये २४ जीबीपर्यंत व्हर्च्युअल रॅम सपोर्ट आहे. प्रोसेसरबद्दल बोलायचे झाले तर स्नॅपड्रॅगन 7 एस जेन 2 चिपसेट रियलमी 12 प्रो + एड्रेनो 710 जीपीयू सह देण्यात आला आहे. 

रियलमी १२ प्रो प्लस 5G: कॅमेरा

रियलमी १२ प्रो प्लस 5G च्या रियर कॅमेरा सेटअपमध्ये ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन (ओआयएस) सह ५० मेगापिक्सलसोनी आयएमएक्स ८९० सेन्सर मेन लेन्स, ओआयएस आणि ६४ एक्स ऑप्टिकल झूमसह ६४ मेगापिक्सलचा ओमनीव्हिजन ओव्ही ३ बी सेन्सर आणि 8 मेगापिक्सलअल्ट्रावाइड अँगल लेन्स चा समावेश आहे. सेल्फीसाठी कंपनी ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देत आहे.

रियलमी १२ प्रो प्लस 5G: बॅटरी

 फोनमध्ये ५००० एमएएच ची बॅटरी आहे, जी ६७ वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. आयपी ६५ रेटिंग असलेल्या या फोनमध्ये दमदार आवाजासाठी डॉल्बी ऑडिओ मिळत आहे.

Whats_app_banner