Smart TV Under 6000: भलामोठा डिस्प्ले आणि डीजेसारखा साउंड; अवघ्या ६ हजारांत खरेदी करा स्मार्ट टीव्ही
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Smart TV Under 6000: भलामोठा डिस्प्ले आणि डीजेसारखा साउंड; अवघ्या ६ हजारांत खरेदी करा स्मार्ट टीव्ही

Smart TV Under 6000: भलामोठा डिस्प्ले आणि डीजेसारखा साउंड; अवघ्या ६ हजारांत खरेदी करा स्मार्ट टीव्ही

Jul 03, 2024 01:53 PM IST

Budget Smart TV: बजेट स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असलेल्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. ग्राहक अवघ्या ६ हजारांत स्मार्ट टीव्ही खरेदी करू शकतात.

६ हजारांत खरेदी करा स्मार्ट टीव्ही
६ हजारांत खरेदी करा स्मार्ट टीव्ही

Kodak Smart TV: मोठ्या स्क्रीनवर क्रिकेट मॅच, वेबसीरिज आणि आवडते चित्रपट पाहण्याचा आनंद काही वेगळाच असतो. परंतु, स्मार्ट टीव्हीच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत, त्यामुळे अनेकजण स्मार्ट टीव्ही खरेदी विचार टाळतात. मात्र, फ्लिपकार्टवर सुरू असलेल्या सेल अंतर्गत ग्राहक अवघ्या ६ हजारांत स्मार्ट टीव्ही खरेदी करू शकतात. 

प्लिपकार्टवर कोडक स्मार्ट टीव्हीवर ग्राहकांना विशेष सवलतीचा लाभ मिळत असून त्याचे एचडी रेडी मॉडेल अगदी स्वस्तात खरेदी करता येणार आहे. मोठ्या डिस्प्लेव्यतिरिक्त या टीव्हीमध्ये २० वॅट क्षमतेचे जबरदस्त स्पीकर्स देण्यात आले आहेत. मोठ्या फ्लॅट डिस्काऊंटव्यतिरिक्त या स्मार्ट टीव्हीच्या खरेदीवर बँक ऑफर्स मिळत आहे. या ऑफरबद्दल आणि स्मार्ट टीव्हीच्या फीचर्सबद्दल जाणून घेऊयात.

फ्लिपकार्टवर ६ हजार ३९९ रुपयांमध्ये लिस्ट

कोडक एचडी रेडी एलईडी स्मार्ट लिनक्स टीव्ही २०२४ एडिशन स्मार्ट टीव्ही फ्लिपकार्टवर ६ हजार ३९९ रुपयांमध्ये लिस्ट करण्यात आला आहे. याशिवाय, निवडक बँक कार्ड असलेल्या ग्राहकांना अतिरिक्त सूट दिली जात आहे. त्यानंतर टीव्हीची किंमत सुमारे ६ हजार रुपये असेल. तसेच या टीव्हीवर २ हजार रुपयांपर्यंत एक्स्चेंज डिस्काउंट मिळत आहे.

स्मार्ट टीव्हीमध्ये २० वॅट क्षमतेचे ड्युअल स्पीकर्स

स्मार्ट टीव्हीमध्ये २४ इंचाचा ६० हर्ट्झ रिफ्रेश रेट डिस्प्ले असून १७८ डिग्री वाइड व्ह्यूइंग अँगल आणि हाय ब्राइटनेस आहे. या टीव्हीमध्ये प्राइम व्हिडिओ आणि यूट्यूब सारख्या ओटीटी अ‍ॅप्सचा अ‍ॅक्सेस आहे. या टीव्हीमध्ये मिराकास्ट आणि वायफायपासून ब्लूटूथ, यूएसबी आणि एचडीएमआयपर्यंत कनेक्टिव्हिटी पर्यायांसह मोबाइल स्क्रीनदर्पण केले जाऊ शकते. सर्वोत्कृष्ट ऑडिओ अनुभवासाठी, या टीव्हीमध्ये २० वॅट क्षमतेचे ड्युअल स्पीकर्स आहेत. अत्यंत पातळ बेजलसह येणारा हा टीव्ही मल्टिटास्किंग सोपा असून मल्टी फंक्शनल स्क्रीन आहे. माली क्वाड-कोर जीपीयू इंजिन एक स्मूथ इंटरफेस आणि चांगली कामगिरी प्रदान करते. हा टीव्ही लिनक्स ओएसवर काम करतो.

 

Whats_app_banner