Stocks To Buy : १०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचे हे ५ छोटे शेअर देऊ शकतात मोठा नफा, तज्ज्ञांनी सुचवली नावे
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Stocks To Buy : १०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचे हे ५ छोटे शेअर देऊ शकतात मोठा नफा, तज्ज्ञांनी सुचवली नावे

Stocks To Buy : १०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचे हे ५ छोटे शेअर देऊ शकतात मोठा नफा, तज्ज्ञांनी सुचवली नावे

Dec 08, 2024 06:22 PM IST

Small Cap Stocks To Buy : कमीत कमी पैशात शेअर मार्केटमध्ये पैसे लावण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी तज्ज्ञांनी काही शेअर्स सुचवले आहेत. पाहा कोणते आहेत हे शेअर्स?

मल्टीबॅगर स्टॉक आदित्य व्हिजन
मल्टीबॅगर स्टॉक आदित्य व्हिजन

Share Market News Today : शेअर बाजारात सुरुवात करायची असेल किंवा तुम्ही शेअर बाजारात आधीपासून गुंतवणूक करत असाल पण तुमच्याकडं मोठी रक्कम नसेल तर तुमच्यासाठी ही बातमी खास आहे. शेअर मार्केट एक्सपर्ट्सनी पुढील आठवड्यात खरेदी करण्यासाठी १०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचे काही स्टॉक्स सुचवले आहेत.

एसएस वेल्थस्ट्रीटच्या संस्थापक सुगंधा सचदेवा आणि हेन्सेक्स सिक्युरिटीजचे एव्हीपी महेश एम ओझा यांनी हे पाच शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. या शेअर्समध्ये सेलिटी इंडिया, श्री रेणुका शुगर्स, आयएफसीआय, एनएचपीसी आणि पीटीसी इंडिया यांचा समावेश आहे.

सुगंधा सचदेवा यांनी केलेली शिफारस

सॅगिलिटी इंडिया :  ३७.३०  रुपये, टार्गेट प्राइस ४३.५० रुपये, स्टॉप लॉस ३४.७० रुपये

२ श्री रेणुका शुगर्स : ४१.३० रुपये दरानं खरेदी करा. ४६.७० रुपयांचं लक्ष्य ठेवून ३८.३० रुपयांवर स्टॉपलॉस ठेवा.

महेश एम ओझा यांनी सुचवलेले शेअर्स

आयएफसीआय : ६७ ते ६८ रुपये, लक्ष्य ७१ रुपये, ७५ रुपये, ७८ ते ८५ रुपये. स्टॉपलॉस ६३ रुपयांवर ठेवावा. 

एनएचपीसी: ८२ ते ८४ रुपयांना खरेदी करावा. लक्ष्य किंमत ८७ रुपये, ८९ रुपये, ९२ रुपये आणि ९८ रुपये ठेवावी.

पीटीसी इंडिया : ४४ ते ४४.७५ रुपयांना खरेदी करा. टार्गेट प्राइस ४८ रुपये, ५२ रुपये आणि ५५ रुपये असावी. स्टॉपलॉस ४२ रुपये ठेवावा.

वॉल स्ट्रीटवर विक्रमी नफावसुली झाल्यानं शुक्रवारी भारतीय शेअर बाजार घसरणीसह बंद झाला. निफ्टी-फिफ्टी ३० अंकांनी घसरून २४,६७७ अंकांवर बंद झाला. तर बीएसई सेन्सेक्स ११७ अंकांनी घसरून ८१,६४८ रुपयांवर बंद झाला, तर निफ्टी बँक निर्देशांक ११० अंकांनी घसरून ५३,४९३ रुपयांवर बंद झाला.

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त केवळ माहितीपर आहे. हिंदुस्तान टाइम्स मराठी कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला देत नाही. त्यामुळं गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)

Whats_app_banner