Defence Stock News : स्मॉल कॅप डिफेन्स कंपनी अपोलो मायक्रो सिस्टिम्सच्या शेअरमध्ये बुधवारी, २९ जानेवारी रोजी जोरदार वाढ झाली. बीएसईवर इंट्राडेमध्ये हा शेअर तब्बल ६ टक्क्यांनी उसळून १२५.८० रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेकडून (DRDO) कंपनीला मिळालेलं कंत्राट हे या तेजीचं कारण आहे.
अपोलो मायक्रो सिस्टिम्स कंपनीला डीआरडीओकडून ऑर्डर मिळाली आहे. अपोलो मायक्रो सिस्टीम्सन २८ जानेवारी रोजी शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत म्हटलं आहे की, संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेकडून (डीआरडीओ) त्यांना ७.३७ कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली आहे. कंपनी डिसेंबर तिमाहीचे निकाल ४ फेब्रुवारी रोजी जाहीर करणार आहे.
अपोलो मायक्रो सिस्टिम्स ही संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेकडून ७.३७ कोटी रुपयांच्या ऑर्डरसाठी सर्वात कमी बोली लावणारी कंपनी ठरली आहे. सर्वात कमी बोली लावण्याचा अर्थ कंपनीनं ऑर्डर मिळवली आहे. डीआरडीओनं नोव्हेंबरमध्ये कंपनीला ऑर्डरही दिली होती.
गेल्या वर्षी २२ नोव्हेंबर रोजी कंपनीनं दिलेल्या एक्स्चेंज फायलिंगमध्ये म्हटलं होतं की, डीआरडीओ आणि अदानीकडून ४.६५ कोटी रुपयांच्या ऑर्डर मिळाल्या आहेत. ३ डिसेंबर २०२४ रोजी कंपनीनं भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) आणि एका खासगी कंपनीकडून २१.४२ कोटी रुपयांच्या ऑर्डर मिळाल्याचं जाहीर केलं होतं.
अपोलो मायक्रो सिस्टीम्सच्या शेअर्समध्ये अलीकडच्या काळात घसरण झाली असून, मागील सत्राच्या अखेरपर्यंत शेअरची किंमत स्थिर होती. जानेवारीत आतापर्यंत हा शेअर मागील महिन्यात १५ टक्क्यांनी वधारल्यानंतर सुमारे ७ टक्क्यांनी वधारला आहे. अपोलो मायक्रो सिस्टीम्सच्या शेअरची किंमत गेल्या वर्षी २३ ऑक्टोबर रोजी ५२ आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर ८८.१० रुपयांवर पोहोचली होती. यावर्षी २१ जानेवारी रोजी तो ५२ आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर, १५७ रुपयांवर पोहोचला होता.
डिसेंबर २०२४ च्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, अपोलो मायक्रो सिस्टीम्समध्ये प्रवर्तकांचा ५५.१२ टक्के हिस्सा आहे, तर बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांचा हिस्सा ४३.२८ टक्के आहे. उर्वरित रक्कम एफआयआय आणि विमा कंपन्यांकडं आहे.
संबंधित बातम्या