मराठी बातम्या  /  बिझनेस  /  SIP investment : पाच वर्षांत ५ लाख रुपये जमा करायचेत? दरमहा गुंतवा फक्त एवढे पैसे

SIP investment : पाच वर्षांत ५ लाख रुपये जमा करायचेत? दरमहा गुंतवा फक्त एवढे पैसे

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
Nov 19, 2022 12:30 PM IST

SIP investment : एसआयपीमध्ये गुंतवणूक करून इच्छित परतावा मिळू शकतो. पुढील पाच वर्षात ५ लाख रुपये जमा करण्यासाठी दरमहा किती रुपये गुंतवू शकता, हे पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

SIP investment HT
SIP investment HT

SIP investment : मध्यमवर्गीय नोकरदार व्यक्तीसाठी मोठी रक्कम वाचवणे ही मोठी गोष्ट आहे. त्यासाठी ते आपल्या पगारातून दरमहा काही रक्कम बाजूला काढतात. काही लोकांसाठी, लाखांची बचत करणे खूप सोपे आहे, तर काहींसाठी ही बचत साध्य करण्यासाठी कित्येक वर्षे लागतात. तुम्हालाही फक्त पाच वर्षांत पाच लाख रुपये जमा करायचे असतील, तर आज आम्ही तुमच्यासाठी SIP योजना सांगणार आहोत. ज्याद्वारे तुम्ही तुमचा इच्छित परतावा सहज मिळवू शकता.

सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लान म्हणजे काय

म्युच्युअल फंडात ठराविक कालावधीत गुंतवणूक करणे म्हणजे एसआयपी. एसआयपीमध्ये साप्ताहिक, मासिक किंवा त्रैमासिक अंतराने गुंतवणूक करता येते.

याचाच अर्थ ठराविक कालावधीमध्ये ठराविक रक्कम गुंतवणूक करावी लागते.चांगली गोष्ट म्हणजे यामध्ये तुम्ही फक्त 500 रुपयांपासून सुरुवात करू शकता. बाजारात अशा अनेक योजना आहेत, ज्या SIP द्वारे गुंतवणुकीवर वेगवेगळे व्याज देतात. म्हणूनच कोणत्याही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यापूर्वी सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा. कारण त्यात धोकाही दडलेला आहे.

मध्यमवर्गीय लोकांच्या गुंतवणुकीसाठी पद्धतशीर गुंतवणूक योजनेकडे पहिली पसंती म्हणून पाहिले जाते. जर तुम्ही दर महिन्याला फक्त 6500 रुपये SIP मध्ये गुंतवले तर पाच वर्षात पाच लाख रुपये जमा होतील. ही योजना तुम्हाला मासिक अंतराने गुंतवणूक करण्याचा आग्रह धरते. दरमहा 6500 रुपये गुंतवल्यास तुमची वार्षिक गुंतवणूक 78 हजार होईल. जे तुम्हाला पाच वर्षे चालू ठेवावे लागेल. म्हणजे पाच वर्षांत तुमची एकूण गुंतवणूक 3 लाख 90 हजार होईल. यामध्ये तुम्हाला 12 टक्के व्याज मिळत असेल तर तुम्हाला 2.5 लाखांपर्यंतचा परतावा मिळेल. म्हणजेच पाच वर्षांनंतर तुमची एकूण रक्कम पाच लाखांपेक्षा जास्त होईल.

याद्वारे तुम्ही जितकी जास्त रक्कम गुंतवाल तितका जास्त परतावा मिळेल. म्हणूनच गुंतवणूक सुरू करण्यापूर्वी तुमचे आर्थिक ध्येय निश्चित करा आणि मग ते साध्य करण्याचा प्रयत्न करा.

WhatsApp channel

संबंधित बातम्या