Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

May 17, 2024 05:16 PM IST

Gold Silver Price Today : लगीनसराई सरल्यामुळं सोन्याच्या भावात किंचित घसरण होत असताना चांदीची चमक मात्र भलतीच वाढली आहे.

चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?
चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

Gold Silver Price Today : चांदीच्या दरात सातत्यानं वाढ होत असून काल रचलेला उच्चांक आज पुन्हा एकदा मोडला आहे. कालपर्यंत ८६२३० रुपये प्रति किलो असलेला भाव किलोमागे ४१ रुपयांनी वाढून ८६२७१ रुपयांवर पोहोचला आहे. सोन्याच्या भावात मात्र किंचित घसरण झाली आहे.

CTA icon

तुमच्या शहरातील सोन्याचा आजचा भाव पाहण्यासाठी इथं क्लिक करा

सोन्या-चांदीच्या किंमतीतील हा मोठा बदल चेन्नई, अहमदाबाद, आग्रा, जयपूर, लखनऊ, कानपूर, दिल्ली, बरेली, एटा, कोलकाता, लुधियाना, चंदीगड, गोरखपूर, इंदूर ते कन्याकुमारीपर्यंत झाला आहे.

सराफा बाजारात आज १७ मे रोजी २४ कॅरेट सोने ५१ रुपयांनी स्वस्त होऊन ७३३८७ रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​उघडले. तर, चांदीचा भाव किलोमागे ४१ रुपयांनी वाढून ८६२७१ रुपये किलो झाला. काल, १६ मे २०२४ रोजी सोन्याचा भाव तोळ्याला ७३,४३८ रुपये तर, चांदीचा भाव किलोमागे ८६,२३० रुपये होता. १९ एप्रिल २०२४ रोजी सोन्याचा भाव ७३५९६ रुपये इतका होता. त्या पातळीवरून आता सोनं काहीसं घसरलं आहे.

मुंबईत आजचा सोन्याचा भाव

मुंबईत २४ कॅरेट सोन्याचा आजचा भाव तोळ्यामागे ७३७५० रुपये इतका आहे. काल हाच भाव ७४०२० रुपये होता. आज तो २७० रुपयांनी घसरला. तर, २२ कॅरेट सोन्याचा आजचा भाव ६७६०० रुपये आहे. १८ कॅरेट सोन्याचा भाव आज तोळ्यामागे ५५,३१० रुपये आहे.

मुंबईत चांदीचा आजचा भाव

सराफा बाजारात एक किलो चांदीचा भाव ८६,२७१ रुपये असला तरी मुंबईत चांदीची चमक भलतीच वाढलेली दिसत आहे. मुंबईत एक किलो चांदी ८९,१०० रुपयांना विकली जात आहे. मागच्या अवघ्या दहा दिवसांत मुंबईत चांदीच्या भावात तब्बल ४१०० रुपयांची वाढ झाली आहे.

जीएसटी, ज्वेलरी मेकिंग चार्जेस आणि विक्रेत्याचा नफा हे सगळं जोडल्यानंतर सोन्याची व चांदीची किंमत आणखी वाढू शकते.

चांदीचा भाव का वाढतोय?

चांदीच्या किमतीत झपाट्यानं होणारी वाढ ही प्रामुख्यानं या धातूमधील अनन्य औद्योगिक गुणधर्मांमुळं होत आहे. या गुणधर्मामुळंच हा धातू सोन्यापेक्षा वेगळा आहे. तांबे, ॲल्युमिनियम, झिंक आणि शिशाच्या किमती यांसारख्या प्रमुख औद्योगिक धातूंच्या पुरवठ्यातील संभाव्य अडथळ्याच्या शक्यतेमुळं एप्रिलपासून त्यांच्या किंमती वाढल्या आहेत. त्याचा परिणाम चांदीच्या भावावर झाला आहे.

Whats_app_banner