Shree Tirupati Balajee IPO GMP : श्री तिरुपती बालाजी अॅग्रो ट्रेडिंग कंपनीच्या आयपीओला पहिल्या दोन दिवसांत गुंतवणूकदारांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. आकडेवारीनुसार, सबस्क्रिप्शनच्या दुसऱ्या दिवशी या आयपीओला १८.१७ पट सबस्क्रिप्शन मिळालं आहे. ग्रे मार्केटमध्ये कंपनीचे शेअर्स ३६ रुपयांच्या प्रीमियमवर उपलब्ध आहेत.
श्री तिरुपती बालाजी आयपीओ जीएमपी (ग्रे मार्केट प्रीमियम) आज ३६ रुपये आहे. शुक्रवारी तो २६ रुपयांच्या प्रीमियमवर उपलब्ध होता. म्हणजेच गुंतवणूकदारांचा आयपीओवरील विश्वास वाढला आहे. गेल्या सलग तीन सत्रांपासून भारतीय शेअर बाजारात विक्रीचा सपाटा दिसत आहे. दलाल स्ट्रीटवरील हे चित्र बदलल्यास ग्रे मार्केटमध्ये आणखी सुधारणा होऊ शकते, असा अंदाज आहे.
दोन दिवसांत हा आयपीओ १८.१७ पट सबस्क्राइब झाला आहे. रिटेल श्रेणीत हा आयपीओ २१.४२ वेळा, एनआयआय (NII) श्रेणीत २८.५६ पट, तर क्यूआयबी (QIB) श्रेणीत ४.६९ पट सब्सक्राइब झाला आहे.
श्री तिरुपतीच्या आयपीओला स्टोक्सबॉक्स ब्रोकरेजनं सबस्क्राइब स्टेटस दिलं आहे. उद्योग वाढीची आशा, क्षमता, नवीन उत्पादन विकास आणि देशांतर्गत आणि जागतिक बाजारातील कंपनीचं स्थान लक्षात घेता मध्यम ते दीर्घकालीन गुंतवणुकीच्या दृष्टीकोनातून या आयपीओला ‘सबस्क्राइब’ करण्याची शिफारस आम्ही करतो, असं स्टोक्सबॉक्सनं म्हटलं आहे.
'गेल्या काही वर्षांतील वाढत्या मागणीमुळं, विशेषत: केमिकल, बांधकाम आणि अन्न व कृषी क्षेत्रातून एफआयबीसी क्षेत्राला क्षमतेचा पूर्ण वापर करण्याची संधी मिळाली आहे, परिणामी कंपन्या विस्तारावर लक्ष देत आहेत. शिवाय, मूल्य साखळीमध्ये नवकल्पना, प्रक्रिया सुधारणा आणि उत्पादनाच्या गुणवत्तेत सातत्यानं सुधारणा झाल्यामुळं एफआयबीसी उद्योग २०२०-२०२३ दरम्यान १.८ टक्के सीएजीआरनं वाढला आहे. या परिस्थितीचा फायदा घेत आपल्या मुख्य क्षमतांवर लक्ष केंद्रित करून आणि आपली क्षमता जास्तीत जास्त वाढवण्याची कंपनीची योजना आहे. गुंतवणूकदार मध्यम ते दीर्घ मुदतीसाठी आयपीओमध्ये गुंतवणूक करू शकतात, असं मास्टर्स कॅपिटल सर्व्हिसेसनं म्हटलं आहे.
आयपीओ सबस्क्रिप्शन शेवटची तारीख ९ सप्टेंबर २०२४ ही आहे. पुढील आठवड्यात सोमवारी आहे. टी + ३ लिस्टिंग नियमाच्या पार्श्वभूमीवर आयपीओचं वितरण बहुधा १० सप्टेंबर रोजी होळी, तर, लिस्टिंग गुरुवारी, १२ सप्टेंबर रोजी होण्याची शक्यता आहे. या आयपीओसाठी ७८ ते ८३ रुपयांचा दरपट्टा निश्चित करण्यात आला आहे. गुंतवणूकदारांना १८० रुपयांचा लॉट घेता येणार आहे.