मराठी बातम्या  /  business  /  FD interest rates : मुदत ठेवीमध्ये गुंतवणूक करायचीये ? या बँका देतायेत आकर्षक व्याजदर,येथे चेक करा
fixed deposit HT
fixed deposit HT

FD interest rates : मुदत ठेवीमध्ये गुंतवणूक करायचीये ? या बँका देतायेत आकर्षक व्याजदर,येथे चेक करा

17 March 2023, 10:41 ISTKulkarni Rutuja Sudeep

FD interest rates : जर तुम्ही मुदत ठेवींमध्ये (एफडी) गुंतवणूक करण्याची योजना आखत असाल तर तुमच्याजवळ आता चांगली संधी आहे. अनेक बँका एफडीवर विशेष योजना देत आहेत. या योजनांमध्ये ३१ मार्चपर्यंत गुंतवणूकीची चांगली संधी आहे. सर्वसामान्य गुंतवणूकदारांसाठी मुदत ठेव हा गुंतवणूकीसाठी चांगला पर्याय मानला जातो.

FD interest rates : आरबीआयने रेपो दरात वाढ केल्यापासून बँकाही ठेवींवरील व्याजदरात वाढ करत आहेत. रेपो दर पाव टक्क्यांनी वाढून ६.५० टक्के झाला आहे. रेपो रेट वाढल्याने कर्ज महाग होते. दुसरे, ठेवींवरील व्याजदर वाढतात. या कारणास्तव, आरबीआयने रेपो दरात वाढ केल्यापासून, एफडी अर्थात बँकांच्या मुदत ठेवींवरील व्याजदर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

ज्येष्ठ नागरिकांना एफडीवर महागाईपेक्षा जास्त व्याज मिळू शकते. अतिरिक्त व्याजदराचा लाभ ज्येष्ठ नागरिकांनाही मिळत आहे. सध्या काही बँका विशेष मुदत ठेव योजना चालवत आहेत, जेथे विशेषत: ज्येष्ठ नागरिकांना सामान्यपेक्षा जास्त परतावा मिळू शकतो. जर तुम्ही देखील त्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला फक्त ३१ मार्च २०२३ पर्यंत गुंतवणूक करण्याची संधी आहे. विशेष एफडी असलेल्या बहुतांश योजना ३१ मार्चनंतर लागू होणार नाहीत.

पंजाब अँड सिंध बँक

पंजाब आणि सिंध बँक त्यांच्या विशेष एफडी योजना पीएसबी फॅब्युलस ३०० दिवस आणि पीएसबी फॅब्युलस प्लस ६०१ दिवस एफडी योजना देत आहे. या योजना ३१ मार्च रोजी संपत आहेत. बँक या योजनांवर सामान्यपेक्षा जास्त परतावा देत आहे.

आयडीबीआय बँक

खाजगी क्षेत्रातील बँक आयडीबीआय बँक “आयडीबीआय नमन ज्येष्ठ नागरिक मुदत ठेव” नावाची विशेष एफडी योजना चालवत आहे. या विशेष एफडीमध्ये ज्येष्ठ नागरिकांना अतिरिक्त ०.५० टक्के व्याजावर ०.२५ टक्के अधिक व्याज मिळत आहे. या एफडी एक वर्ष ते १० वर्षात परिपक्व होतील. बँकेने २० एप्रिल २०२२ रोजी ही योजना सुरू केली. यामध्ये ३१ मार्च २०२३ पर्यंत गुंतवणूक करता येईल. या एफडीमध्ये तुम्ही किमान दहा हजार आणि कमाल २ कोटी रुपयांची गुंतवणूक करू शकतात.

स्टेट बँक आॅफ इंडिया

स्टेट बँक ऑफ इंडियाने १५ फेब्रुवारी २०२३ रोजी “४०० दिवस” (अमृत कलश) नावाचा एक अनोखा टर्म प्लॅन लॉन्च केला आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना ७.६० टक्के तर सर्वसामान्यांना ७.१० टक्के व्याज मिळत आहे. ही विशेष एफडी योजना ३१ मार्च २०२३ पर्यंत सक्रिय आहे. एसबीआय़ची दुसरी योजना एसबीआय वी केअर एफडी योजना आहे. यामध्ये स्टेट बँक ज्येष्ठ नागरिकांना ५ ते १० वर्षांच्या मुदत ठेवींवर ७.५ टक्के व्याज देत आहे. बँकेच्या या योजनेत फक्त ३१ मार्च २०२३ पर्यंत गुंतवणूक करण्याची संधी आहे.

विभाग