बाजारात वादळात सुरू आहे हा शेअर, शेअर बाजाराने कंपनीकडे मागितले जाब-shoppers stop share hit fresh record high bse nse seek clarification detail is here ,बिझनेस बातम्या
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  बाजारात वादळात सुरू आहे हा शेअर, शेअर बाजाराने कंपनीकडे मागितले जाब

बाजारात वादळात सुरू आहे हा शेअर, शेअर बाजाराने कंपनीकडे मागितले जाब

HT Marathi Desk HT Marathi
Sep 12, 2024 07:02 PM IST

चौथ्या दिवशी हा शेअर ५.८७ टक्क्यांनी वधारून ९४३.६५ रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. शेअरचा ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर ६२३ रुपये आहे. शेअरची ही किंमत नोव्हेंबर २०२३ मध्ये होती.

सेन्सेक्स
सेन्सेक्स ((Photo: Reuters))

शेअर बाजारातील ऐतिहासिक तेजीदरम्यान फॅशन आणि गारमेंट व्यवसायात सक्रिय असलेल्या शॉपर्स स्टॉप लिमिटेड या कंपनीच्या शेअर्समध्ये गुरुवारी वादळी वातावरण होते. आठवड्याच्या चौथ्या दिवशी हा शेअर ५.८७ टक्क्यांनी वधारून ९४३.६५ रुपयांवर पोहोचला. शेअरचा ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर ६२३ रुपये आहे. शेअरची ही किंमत नोव्हेंबर २०२३ मध्ये होती.

१२ सप्टेंबर रोजी मुंबई शेअर बाजार आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंजने शॉपर्स स्टॉप लिमिटेडकडून शेअर वॉल्यूम मूव्हमेंटबाबत स्पष्टीकरण मागितले होते. त्यावर उत्तर देताना कंपनीने शेअर बाजाराला सांगितले की, आम्ही तुम्हाला सूचित करू इच्छितो की, कोणतीही माहिती/घोषणा नाही, ज्यामुळे शेअरमध्ये वाढ झाली आहे. आम्ही पुन्हा सांगू इच्छितो की कंपनी नेहमीप्रमाणे अशा कोणत्याही अपडेटची माहिती स्टॉक एक्स्चेंजला देत राहील. कृपया इतर कोणत्याही आवश्यक माहितीसाठी आम्हाला लिहा.

गेल्या महिन्यात शॉपर्स स्टॉपने हॉलिवूड मेकअप ब्रँड मॅक्स फॅक्टरसोबत धोरणात्मक सहकार्याची घोषणा केली होती. मॅक्स फॅक्टरने हाऊस ऑफ ब्युटी आणि शॉपर्स स्टॉप यांच्या सहकार्याने भारतात या क्षेत्रात प्रवेश करण्याची घोषणा केली.

शेअरहोल्डिंग पॅटर्न

जून 2024 पर्यंत शॉपर्स स्टॉप लिमिटेडमध्ये प्रवर्तकांचा 65.58 टक्के हिस्सा होता. तर, सार्वजनिक भागधारकांचा कंपनीत ३४.४२ टक्के हिस्सा आहे. प्रवर्तकांमध्ये नील चंद्रू रहेजा आणि रवी चंद्रू रहेजा यांचा समावेश आहे.

Whats_app_banner
विभाग