मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Emcure Pharma IPO : 'शार्क टँक'च्या जज नमिता थापर यांना आयपीओमुळं होणार छप्परफाड फायदा, तब्बल १२७ कोटी मिळणार

Emcure Pharma IPO : 'शार्क टँक'च्या जज नमिता थापर यांना आयपीओमुळं होणार छप्परफाड फायदा, तब्बल १२७ कोटी मिळणार

Jul 02, 2024 05:16 PM IST

Emcure pharmaceuticals ipo news : ३ जुलै रोजी बाजारात दाखल होत असलेल्या एमक्युअर फार्मास्युटिकल्सच्या आयपीओचा शार्क टँकच्या परीक्षक नमिता थापर यांना छप्परफाड फायदा होणार आहे.

शार्क टँकची जज नमिता थापर हिला आयपीओमुळं मोठा फायदा, तब्बल १२७ कोटी मिळणार
शार्क टँकची जज नमिता थापर हिला आयपीओमुळं मोठा फायदा, तब्बल १२७ कोटी मिळणार

Shark Tank Judge namita Thapar : आयपीओमधील गुंतवणूक अनेकदा गुंतवणूकदारांना छप्परफाड फायदा मिळवून देणारी ठरते. प्रमोटर्सही त्याला अपवाद नसतात. शार्क टँक इंडिया शोच्या परीक्षक नमिता थापर यांनाही हा अनुभव सध्या येत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

नमिता थापर सीईओ असलेल्या एमक्युअर फार्मास्युटिकल्सचा आयपीओ बुधवारी बाजारात येणार आहे. या आयपीओमुळं नमिता थापर यांची मोठी कमाई होणार आहे. त्यांना जवळपास १२७ कोटी रुपये मिळतील असा अंदाज आहेत. नमिता थापर या कंपनीच्या प्रमोटर ग्रुपच्या सदस्यही आहेत.

इकॉनॉमिक टाईम्सच्या रिपोर्टनुसार, नमिता थापर यांनी कंपनीचे लाखो शेअर्स ३.४४ रुपये प्रति शेअर या दरानं खरेदी केले होते. मार्च २०२४ पर्यंत कंपनीतील त्यांची एकूण हिस्सेदारी ३.५ टक्के होती. त्यांच्याकडं एकूण ६३.३९ लाख शेअर्स आहेत. तेव्हा या शेअर्सचं मूल्य २.१८ कोटी रुपये होतं. एमक्युअर फार्मास्युटिकल्सच्या द्वारे आता त्या ऑफर फॉर सेल अंतर्गत १२.६८ लाख शेअर्स विकणार आहेत. त्यामुळं त्यांना २९३ पट नफा मिळू शकतो.

आयपीओचा दरपट्टा किती?

एमक्युअर फार्मास्युटिकल्सचा आयपीओ ३ जुलै ते ५ जुलै २०२४ असे तीन दिवस गुंतवणुकीसाठी खुला असेल. १० रुपये दर्शनी मूल्य असलेल्या या शेअरच्या आयपीओसाठी ९६० ते १००८ रुपये प्रति शेअर असा दरपट्टा निश्चित करण्यात आला आहे. आयपीओच्या माध्यमातून कंपनी १९५२.०३ कोटी रुपये उभारण्याचा प्रयत्न करणार आहे. ऑफर फॉल सेल अंतर्गत १.१४ कोटी शेअर्स आणि फ्रेश इश्यूद्वारे ७९ लाख शेअर्स कंपनी विक्रीस काढणार आहे.

ग्रे मार्केटमध्ये तुफान

ग्रे मार्केटमध्ये Emcure Pharmaceuticals IPO चा शेअर आज २८५ रुपयांच्या प्रीमियमवर ट्रेडिंग करत आहे. लिस्टिंग होईपर्यंत हीच स्थिती राहिल्यास, कंपनी २८ टक्के प्रीमियमनं शेअर बाजारात पदार्पण करू शकते. जीएमपीमध्ये दररोज बदल दिसत आहेत.

कंपनीची आर्थिक स्थिती किती चांगली?

गेल्या आर्थिक वर्षात कंपनीची आर्थिक स्थिती चांगली होती. २०२४ च्या आर्थिक वर्षात कंपनीचा एकूण महसूल ११ टक्क्यांच्या वाढीसह ६६५८ कोटी रुपये होता. तथापि, नफ्यात (PAT - Profit After Tax) घट झाली आहे. वार्षिक आधारावर आर्थिक वर्ष २०२४ मध्ये कंपनीचा नफा ५२७ कोटी रुपये आहे.

(डिस्क्लेमर : हे वृत्त केवळ माहितीपर आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते. त्यामुळं कोणतीही गुंतवणूक करण्याआधी तज्ञांचा सल्ला घ्या.)

WhatsApp channel
विभाग