Shark tank India : शेअर बाजारात बुडाले शार्क टँकच्या जजचे १.५ कोटी; कुठं चुकलं गणित? वाचा!
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Shark tank India : शेअर बाजारात बुडाले शार्क टँकच्या जजचे १.५ कोटी; कुठं चुकलं गणित? वाचा!

Shark tank India : शेअर बाजारात बुडाले शार्क टँकच्या जजचे १.५ कोटी; कुठं चुकलं गणित? वाचा!

Updated Feb 16, 2023 08:30 PM IST

Shark tank India : सध्या देशभरात गाजत असलेल्या बिझनेस शो शार्क टॅकच्या जजने शेअर बाजारात तब्बल १.५ कोटी रुपये गमावले होते. दिवाळखोरी जाहीर झाल्यानंतरही न डगमगता त्यांनी पैसे रिकव्हर केले. शार्क टँक इंडिया सिझन २ दरम्यान त्यांनी सगळ्यांना हे सत्य उलघडून सांगितले.

amit jain, sharp tank judge HT
amit jain, sharp tank judge HT

Shark tank India : सध्या देशभरात गाजत असलेल्या बिझनेस शो शार्क टॅकचे जज अमित जैन यांनी शेअर बाजारात तब्बल १.५ कोटी रुपये गमावले होते. दिवाळखोरी जाहीर झाल्यानंतरही न डगमगता त्यांनी पैसे रिकव्हर केले. शार्क टँक इंडिया सिझन २ दरम्यान त्यांनी सगळ्यांना हे सत्य उलघडून सांगितले.

लोकप्रिय बिझनेस रिअॅलिटी शो शार्क टँक इंडिया सीझन २ चे जज अमित जैन यांनी अलीकडेच शेअर बाजारात गुंतवणूक केली. त्यांची दिवाळखोरी जाहीर झाली होती. याची एक कथा त्यांनी शो दरम्यान शेअर केली. त्यांना शेअर बाजारात दीड कोटी रुपयांचा फटका बसला, हे त्यांच्यासाठी सर्वात मोठे नुकसान होते.

कारदेखोचे सह-संस्थापक आणि सीईओ अमित जैन यांनी सांगितले की, शेअर्समध्ये प्रचंड नुकसान झाल्यानंतर भांडवल कमी झाले. माझ्यासाठी हे सर्वात मोठे नुकसान होते. परंतु आम्हाला विश्वास होता की आम्ही मेहनत आणि खंबीरपणे हे नुकसान पुन्हा भरून काढू.

शार्क टँकच्या लोकप्रियतेबद्दल अमित जैन म्हणाले की, त्याचा पहिला शो खूप लोकप्रिय होता आणि त्यामुळे देशातील उद्योजक घडवण्यास मदत झाली आणि आजच्या काळात बहुतेक लोकांना याबद्दल माहिती आहे. ते म्हणाले की मी १५ वर्षांपासून त्यांची कंपनी चालवत आहेत आणि आता लोकांना मदत करण्याची वेळ आली आहे. लोकांकडून व्यवसायाविषयी अनेक गोष्टी शिकायला मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

शेअर बाजारातील नुकसानीनंतर त्यांनी कंपनीत योग्य गुंतवणूक धोरण आखले. शार्क टँक जजनीसांगितले की त्यांनी पुनर्प्राप्तीसाठी कठोर परिश्रम केले आणि योग्य ठिकाणी पैसे गुंतवले. अमित जैन एका छोट्या शहरातून आला आहे आणि त्याला कधीही प्रसिद्ध होण्याची इच्छा नव्हती.

दरम्यान शार्प टँक शोमधील जज नमिता थापर यांनी शेअर बाजारात सर्वाधिक गुंतवणूक केली आहे. या हंगामातील केवळ ५ आठवड्यांमध्ये ४२.९३ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे.

Whats_app_banner