मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Shariah Mutual Funds : मुस्लिम लोकांसाठी 'हलाल' आहे हा शरिया म्युच्युअल फंड, मिळतो बक्कळ परतावा,कारण इथे काहीच नाही हराम

Shariah Mutual Funds : मुस्लिम लोकांसाठी 'हलाल' आहे हा शरिया म्युच्युअल फंड, मिळतो बक्कळ परतावा,कारण इथे काहीच नाही हराम

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
Jul 13, 2023 04:58 PM IST

Shariah Compliant Mutual Funds : इस्लाममध्ये व्याजाची कमाई आणि दारुपासून ते पोर्कपर्यंतचा व्यवसायही हराम मानला जातो. त्यामध्ये हा फंड हलाल कमाईसाठी पर्याय उपलब्ध करुन देतो.

Shariah compliant HT
Shariah compliant HT

Shariah Compliant Mutual Funds : सुरक्षित भविष्यासाठी बचत आणि गुंतवणूक आवश्यक आहे. प्रत्येकाला आपले भविष्य सुरक्षित करायचे असल्याने, लोक बँक एफडीकडे पोस्ट ऑफिस योजना आणि शेअर बाजाराकडे वळतात.

ट्रेंडिंग न्यूज

तथापि, हे उपाय प्रत्येकासाठी योग्य आहेत असे सिद्ध होत नाही. उदाहरणार्थ मुस्लिम समाजाकडे बघा.मुस्लिमांमध्ये व्याजाचा पैसा हराम मानला जातो. यासोबतच दारू-सिगारेट आणि डुकराचे मांस यांसह अनेक प्रकारचे काम-व्यवसायही इस्लाममध्ये निषिद्ध आहेत. बाजारात प्रचलित गुंतवणूक-बचत साधनांच्या बाबतीत इस्लामच्या धार्मिक श्रद्धा आड येतात. अशा परिस्थितीत प्रश्न पडतो की, इस्लामला मानणाऱ्या करोडो लोकांनी आपले भविष्य सुरक्षित करण्यासाठी काय करावे? पण तत्पुर्वी इस्लाममध्ये कोणकोणत्या गोष्टी हराम आहेत ते जाणून घ्या

इस्लाममध्ये निषिद्ध असणाऱ्या गोष्टी

इस्लाम अशा कोणत्याही ठिकाणी पैसे गुंतवण्यास मनाई करतो, ज्यामुळे लोकांचे शारीरिक किंवा भावनिक नुकसान होते. त्याचप्रमाणे पर्यावरणाला हानी पोहोचवणाऱ्या आणि शस्त्रास्त्रांना प्रोत्साहन देणाऱ्या बाबी इस्लामिक कायद्यात बंदी आहे. इस्लाम मुस्लिमांना दारू, तंबाखू, डुकराचे मांस, शस्त्रे, जुगार, पॉर्न इत्यादींशी संबंधित व्यवसायांमध्ये पैसे गुंतवण्यास मनाई करतो. त्याचप्रमाणे, आणखी एक बंधन व्याजाच्या पैशांबाबत आहे. व्याजाचे पैसे घेणे म्हणजे थेट देवाविरुद्ध युद्ध सुरू करणे, अशी समज इस्लाममध्ये आहे. या कारणास्तव, मुस्लिम लोक व्याज देणाऱ्या कोणत्याही गुंतवणूक पद्धतीत आपले पैसे गुंतवणे टाळतात. त्यासाठी बँक, शेअर बाजार यांसारख्या ठिकाणीही गुंतवणूक ते करत नाहीत.

असा काम करतो हलाल फंड

इस्लामिक कायद्यांतर्गत या अडथळ्यांवर मात करून काही कंपन्यांनी करोडो मुस्लिमांना गुंतवणूक आणि बचतीचे पर्याय उपलब्ध करून देण्याचे काम केले आहे. या कंपन्यांनी त्यासाठी विशेष फंड सुरू केले आहेत, जे शरियतच्या हराम-हलाल कायद्यांचे काटेकोरपणे पालन करुन पोर्टफोलिओचे व्यवस्थापन करतात. हे फंड कधीही अशा कंपन्यांमध्ये गुंतवणूक करत नाहीत ज्यांचा व्यवसाय शरियतनुसार हराम आहे. व्याजातून सूट देणारी कंपनी शोधणे अशक्य असल्याने हे फंड फक्त काहीच कंपन्यांपुरते मर्यादित आहेत. या कंपन्यांचा एकूण कमाईमध्ये व्याज कमाईचा वाटा ३% पेक्षा जास्त नाही. यात दुसरी अट अशी आहे की हे फंड ज्या कंपन्यांचे एकूण कर्ज त्यांच्या एकूण मालमत्तेच्या २५ टक्क्यांपेक्षा कमी आहे त्याच कंपन्यांमध्ये पैसे गुंतवतात.

भारतात कधी झाली सुरुवात

भारतात शरीयत कायद्याप्रमाणे म्युच्युअल फंड सुरू करण्याचे श्रेय S&P ला जाते. अशा फंडांना शरीयत कंप्लायंट म्युच्युअल फंड म्हणतात, S&P ने २०१० मध्ये भारतात असे दोन फंड लाँच केले. दोन्ही सुरुवातीचे हलाल फंड एस अँड पी सीएनएक्स ५०० शरिया आणि एस अँड पी सीएनएक्स निफ्टी शरीया होते. आता हे दोन्ही फंड बंद पडले आहेत. मात्र सध्याच्या काळात टाटा एथिकल फंड, टॉरस एथिकल फंड आणि निप्पॉन इंडिया ईटीएफ शरिया बीईएस देखील उपलब्ध आहेत. त्यात गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला डिमॅट खाते आवश्यक असेल, कारण ते ईटीएफ मध्ये उपलब्ध आहेत.

रिटर्न्स

रिटर्न्सच्या बाबतीत हे फंड बँक एफडीपेक्षा दुप्पट परतावा देतात. जिथे बँक मुदत ठेवीत ७.५० टक्के परतावा मिळतो तिथे या तीनही फंडातून अंदाजे १९ टक्के परतावा मिळू शकतो.

WhatsApp channel

विभाग