Share Market News : शेअर बाजारात सध्या प्रचंड अस्थिरता आहे. बाजार पडेल की सावरेल याबाबत कोणालाच काहीही अंदाज बांधता येईनासा झाला आहे. अशा परिस्थितीत तज्ज्ञांनी ५ स्टॉक्स खरेदीसाठी सुचवले आहेत.
चॉईस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमित बागरिया आणि आनंद राठी येथील तांत्रिक संशोधनाचे वरिष्ठ व्यवस्थापक गणेश डोंगरे यांनी हे स्टॉक सुचवले आहेत. यात मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड, एयू स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड, इंडस टॉवर्स लिमिटेड, पीबी फिनटेक लिमिटेड आणि डिक्सन टेक्नॉलॉजीज (इंडिया) लिमिटेड यांचा समावेश आहे.
सुमित बागरिया यांची शिफारस
मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड रु. ११७४१.१५ मध्ये खरेदी करा. लक्ष्य किंमत १२५६३ रुपये ठेवा आणि स्टॉप लॉस ११३३० वर ठेवा.
का खरेदी करावा? सप्टेंबर २०२४ पासून विक्रीचा लक्षणीय दबाव अनुभवल्यानंतर आता शेअर त्याच्या सपोर्ट लेव्हलपासून १०,७०० वर परतला आहे. या ब्रेकआउटला ट्रेडिंग व्हॉल्यूमचा आधार असून तो तेजीचे संकेत देतो.
एयू स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड (AU Small Finance Bank Limited)
हा शेअर ५७५.१० रुपयांना खरेदी करा. लक्ष्य किंमत ६१५ रुपये आणि स्टॉप लॉस ५५५ रुपये ठेवा.
का खरेदी करावा? दैनंदिन चार्टवर संभाव्य ब्रेकआउटचे संकेत मिळतात. या अपेक्षित ब्रेकआउटला वाढत्या ट्रेडिंग व्हॉल्यूमचा आधार आहे. त्यातून स्टॉकच्या तेजीचे संकेत मिळतात.
इंडस टॉवर्स लिमिटेड (Indus Towers Ltd)
हा शेअर सुमारे ३४० रुपयांना खरेदी करा. लक्ष्य ३६० रुपये आणि स्टॉप लॉस ३२५ रुपये ठेवा.
तेजीचा रिव्हर्सल पॅटर्न संभाव्य अल्प-मुदतीच्या अपट्रेंडकडे निर्देश करत आहे. त्यानुसार हा स्टॉक ३६० रुपयांच्या दिशेनं रिट्रेसमेंट अनुभवू शकतो.
पीबी फिनटेक लिमिटेड (PB Fintech Limited)
हा शेअर १७४० रुपयांना खरेदी करा. स्टॉप लॉस १७०० रुपयांवर ठेवून १८०० चे लक्ष्य ठेवा.
सध्या स्टॉकमध्ये 1700 रुपयांचा महत्त्वाचा सपोर्ट लेव्हल आहे, जो संभाव्य रिबाउंडसाठी ठोस आधार म्हणून काम करतो. हा तांत्रिक सेटअप व्यापाऱ्यांना दीर्घ पोझिशन घेण्याचा विचार करण्याची एक अनुकूल संधी सूचित करतो.
डिक्सन टेक्नॉलॉजीज लिमिटेड (Dixon Technologies (India) Ltd)
हा शेअर १७,५०० रुपयांचं लक्ष्य ठेवून १६२७५ रुपयांवर खरेदी करा. स्टॉप लॉस १५७०० रुपये ठेवा.
संबंधित बातम्या