Stocks To Buy : आज खरेदीसाठी मार्केट तज्ज्ञांनी सुचवले टीसीएस, मॅरिको, एचसीएलसह तब्बल १२ शेअर्स
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Stocks To Buy : आज खरेदीसाठी मार्केट तज्ज्ञांनी सुचवले टीसीएस, मॅरिको, एचसीएलसह तब्बल १२ शेअर्स

Stocks To Buy : आज खरेदीसाठी मार्केट तज्ज्ञांनी सुचवले टीसीएस, मॅरिको, एचसीएलसह तब्बल १२ शेअर्स

Jan 13, 2025 09:18 AM IST

Stocks To Buy Today : आठवड्याच्या पहिल्या दिवशी आज खरेदी करण्यासाठी शेअर मार्केट तज्ज्ञांनी १२ स्टॉक्स सुचवले आहेत.

Stocks To Buy : आज खरेदीसाठी मार्केट तज्ज्ञांनी सुचवले तब्बल १२ शेअर्स
Stocks To Buy : आज खरेदीसाठी मार्केट तज्ज्ञांनी सुचवले तब्बल १२ शेअर्स

Share Market News : मार्केट एक्सपर्ट्सनी आज खरेदीसाठी तब्बल १२ शेअर्स सुचवले आहेत. सुमित बागरिया यांनी आरबीएम इन्फ्राकॉन, रामकृष्ण फोर्जिंग्स, मेडिको रेमेडीज, युनो मिंडा आणि प्रिकोल हे ५ शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. तर सेबीकडं नोंदणीकृत मार्केट एक्सपर्ट अंकुश बजाज यांनी टीसीएस, मॅरिको, एसआरएफ खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तर निओट्रेडरचे राजा वेंकटरमण यांनी गुफिक बायोसायन्सेस, एचसीएल टेक आणि कल्याण ज्वेलर्स इंडिया तर, मार्केटस्मिथ इंडियानंही टीसीएस आणि एअरटेल खरेदी करण्याची शिफारस केली आहे.

सुमित बागरिया यांचे ब्रेकआऊट शेअर्स

आरबीएम इन्फ्राकॉन

हा शेअर ६४३ रुपयांना खरेदी करा, ६८० रुपयांचे टार्गेट ठेवा आणि ६२० रुपयांवर स्टॉपलॉस ठेवायला विसरू नका.

रामकृष्ण फोर्जिंग्स

 ९५७.१० रुपयांत खरेदी, १०२० रुपयांवर टार्गेट आणि ९२० रुपयांवर स्टॉप लॉस.

मेडिको रेमेडीज

हा शेअर ६३.१४ रुपयांत खरेदी करा, ६८ रुपयांवर टार्गेट आणि ६० रुपयांवर स्टॉप लॉस ठेवा.

युनो मिंडा

हा शेअर १०९७.६५ रुपये, टार्गेट ११५५ रुपये आणि स्टॉपलॉस १०६५ रुपये ठेवा.

प्रिकोल

हा शेअर ५५९.३० रुपयांना खरेदी करा. टार्गेट ५९५ रुपये ठेवा आणि ५४० रुपयांवर स्टॉप लॉस लावा.

अंकुश बजाज यांचे शेअर्स

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) :

टीसीएस ४,२६५ रुपयांना खरेदी करा. टार्गेट प्राइस ४,३५० ते ४,३७० रुपये आणि स्टॉपलॉस ४,२०२ रुपये ठेवा.

मॅरिको

हा शेअर ६७३.९० रुपयांना खरेदी करा; लक्ष्य ६९५-७०५ रुपये आणि स्टॉपलॉस ६६० रुपये ठेवा.

एसआरएफ

हा शेअर २,६०२ रुपये दरानं खरेदी करा; लक्ष्य २,८०० रुपये आणि स्टॉप लॉस २,४८० रुपये ठेवा.

के. राजा वेंकटरमण यांचे शेअर्स

गुफिक बायोसायन्सेस

हा शेअर ४७० रुपयांपर्यंत खरेदी करा. ४५२ रुपये स्टॉपलॉस लावून लक्ष्य ४९८ रुपये ठेवा.

एचसीएल टेक

हा शेअर १९९५ रुपयांना खरेदी करा. स्टॉपलॉस १९७० रुपये आणि लक्ष्य २०३५ रुपये ठेवा.

कल्याण ज्वेलर्स इंडिया

हा शेअर ६२५ रुपयांना घ्या. लक्ष्य ६३५ रुपये आणि स्टॉपलॉस ६१० रुपये ठेवा.

मार्केटस्मिथ इंडियाची शिफारस

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड

सध्या शेअरची बाजारातील किंमत ४,२६५.६५ रुपये आहे. खरेदीची रेंज ४,२०० ते ४,३०० रुपये आहे. लक्ष्य ४७०० आणि स्टॉपलॉस ३९९० रुपयांवर ठेवा. कालावधी १-२ महिने असावा.

भारती एअरटेल लिमिटेड

या शेअरची सध्याची किंमत १६१५.९० रुपये आहे. आजची खरेदी रेंज १५७५ ते १६२५ रुपये आणि टार्गेट १८५० रुपये आहे. स्टॉपलॉस १५१० रुपये ठेवा. मुदत ३ ते ४ महिन्यांची आहे.

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त केवळ माहितीपर आहे. तज्ज्ञांची मतं, सूचना व शिफारशी त्यांच्या वैयक्तिक आहेत. हिंदुस्तान टाइम्स मराठी कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला देत नाही. त्यामुळं गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)

Whats_app_banner