Bank Stocks : अमेरिकी बँकिंग संकटाची चिंता सोडा! लगेचच खरेदी करा हे बँक स्टाॅक्स, तज्ज्ञांचा सल्ला
Bank Stocks : सध्या अमेरिकन बँकिंग क्षेत्रात होणाऱ्या घडामोडींचा परिणाम हा भारतीय शेअऱ बाजारावर झाला आहे. इथले बँकिंग स्टाॅक्सही गडगडले. पण हीच गुंतवणूकीची संधी ठरु शकते. तज्ज्ञांनी हे बँक स्टाॅक्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
Bank Stocks : अमेरिकन बँका बंद झाल्यामुळे, जर भारतात बँक स्टाॅक्समध्ये गुंतवणूक करण्यास तुम्ही हात आखडता घेत असाल तर कदाचित हा निर्णय चूकू शकतो. तज्ज्ञ यूनियन बँक, स्टेट बँक, बँक आँफ बडोदा, कॅनरा बँक, आयसीआययीआय बँक, आरबीएल बँक, इंडसएंड बँक स्टाॅक्समध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत आहेत. येत्या काही दिवसात या बँकिंग स्टाॅक्समध्ये जबरदस्त परतावा मिळू शकतो.
ट्रेंडिंग न्यूज
अॅक्सिस बँकेच्या शेअर्सबद्दल ५९ पैकी अंदाजे ५८ तज्ज्ञ अॅव्हरेज १०९८.०२ रुपयांचा टार्गेट प्राईससह खरेदीचा सल्ला देतात. एक तज्ज्ञ प्रभूदास लिलाधर यांनी ८३० रुपयांच्या टार्गेट प्राईससह शेअर्स विक्रीचा सल्ला दिला आहे. मोतीलाल ओसवालने ११३० रुपयांच्या टार्गेट प्राईसह खरेदीचा सल्ला दिला आहे. सुरुवातीच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अॅक्सिस बँकेचा स्टाॅक्स किरकोळ घसरणीसह ८२९.८५ रुपयांवर ट्रेड करत होता.
यूनियन बँकेच्या शेअर्सबद्दल १८ तज्ज्ञ बुलिश आहेत. त्यांनी ९२.१७ रुपयांच्या अॅव्हरेज टार्गेट प्राईससह शेअर्स खरेदीचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवालने टार्गेट प्राईस १०० रुपये ठेवले आहे. सुरुवातीच्या सत्रात हा स्टाॅक्स ६९.१५ रुपयांवर ट्रेड करत होता.
कॅनरा बँकेबद्दल २२ पैकी २० शेअर तज्ज्ञ बुलिश आहेत. दोघांनी शेअर्स विक्रीचा सल्ला दिला आहे. शेअर्स खरेदीबद्दल टार्गेट प्राईस ३४९.७३ रुपये आहे. तर मोतीलाल ओसवालने ४१० रुपयांचे टार्गेट प्राईस ठेवले आहे. आज किरकोळ घसरणीसह २८६.६५ रुपयांवर शेअर्स ट्रेड करत होता.
आयसीआयसीआय बँकेच्या शेअर्सचे मूल्य येत्या काही दिवसात ११५९ रुपयांवर पोहोचू शकते. ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवालने टार्गेट प्राईस ११५० रुपये निर्धारित केले आहे. आज हा स्टाॅक किरकोळ वाढीसह ८२९.१० रुपयांवर ट्रेड करत होता.
(डिस्क्लेमर: ही माहिती केवळ कंपन्यांच्या शेअर मार्केटमधील कामगिरीवर आधारीत आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. त्यामुळं वाचकांनी आपल्या वित्तीय सल्लागाराच्या सुचनेनुसारच गुंतवणुकीचा निर्णय घ्यावा.)